MLC Election Results : आज विधान परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

MLC Election Results : आज विधान परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

मुंबई : आज पदवीधर (Graduate Constituency Election)आणि शिक्षक मतदार संघातील (Teacher Constituency Election)निवडणुकांचे निकाल (Result)जाहीर होणार आहेत. निवडणुकीनंतर उमेदवारांसाठी आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. उमेदवारांची धाकधूक वाढलीय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणारंय. राज्यातील नाशिक (Nashik), अमरावती (Amravati)पदवीधर तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूरसह(Nagpur) कोकण शिक्षक (Kokan)मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणारंय. पण त्यामधील सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघात नक्की काय होणार? यावर सुरु आहे. प्रत्येकजण आपापले आडाखे बांधताना दिसत आहे. पण त्यामध्ये कोण बाजी मारणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकांचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच चर्चेत आला आहे. त्यामध्ये काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली मात्र काँग्रसेचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. उलट त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबन केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं. त्यांनंतर महाविकास आघाडीनं त्यांना अधिकृत पाठिंबा दिला.

औरंगाबादच्या निवडणुकीत भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्यासमोर विक्रम काळेंचं तगडं आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीचा चर्चा रंगली.

अमरावतीमध्ये भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावताहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे उभे आहेत.

नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहे. पण, इथं चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले, भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube