सोलापूरच्या न्युरोसर्जन वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; सुसाईड नोटमधील महिलेच्या नावाने गुढ वाढलं

twist in Solapur’s neurosurgeon Shirish Valsangkar Death case after note : दोन दिवसांपूर्वी 18 एप्रिल रोजी सोलापूरमधून वैद्यकीय क्षेत्रातून एक दुखद बातमी समोर आली होती. प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Walsangkar) यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
शिंदेंप्रमाणे फडणवीसांनाही संताप झालाय पण… ठाकरे बंधूंच्या युतीवरून राऊतांचा निशाणा
यामध्ये आता शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण यामध्ये एका महिलेचं नाव समोर आलं आहे. या महिलेची ओळख देखील पटली असून वळसंगकर यांनी या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचं लिहिलेलं आहे. त्यामुळे आता या महिले विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून मतदार यादीबाबत तक्रारींचा पाऊस; निवडणूक आयोगाने उचललं मोठ पाऊल, आता तुम्ही…
मनीषा मुसळे- माने असं या महिलेचं नाव आहे. ही महिला शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडून रूग्णांकडून येणारे बिल ही कोणतीही नोंद न करता स्विकारली जात होती. ही गोष्ट वळसंगकरांना खटकल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकले होते. मात्र तिने वळसंगकरांना आत्महत्येची धमकी दिली होती. मात्र वळसंगकरांना रूग्णालयाचे सर्व व्यवहार कागदोपत्री हवे होते. प्रशासनाकडून हे केले जात नसल्याने वळसंगकर तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?
सोलापुरच्या वैद्यकीय क्षेत्रात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे सोलापुरात शोककळा पसरलीयं. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज 18 एप्रिल रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीयं. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या का केलीयं? हे आता काहीस स्पष्ट झालं असून या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत अद्याप तरी अस्पष्टता असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.