चर्चांना कंटाळलो, जे व्हायचं असेल ते होईल; पाटील आणि आष्टीकर शिंदेंच्या गळाला कसे लागले?

Sanjay Dina Patil and Nagesh Patil Ashtikar शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या अवघ्या एक दिवस आधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Sanjay Dina Patil And Nagesh Patil Ashtikar

Ubt Rebel Mp Sanjay Dina Patil and Nagesh Patil Ashtikar how get drawn into Eknath Shinde Party : शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं आहे. यामध्ये ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. यातील संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर शिंदेंच्या गळाला कसे लागले? जाणून घेऊ सविस्तर…

Maharashtra Politics : ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का, 3 खासदार NDA च्या वाटेवर?

ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले तरी आष्टीकर यांच्या समर्थकांनी ही भेट मतदारसंघातील विकासकामे आणि निधीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी झाल्याचे सांगितले आहे. मात्र, राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.

ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट

दरम्यान, काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेते आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. यापूर्वीही काही लोकप्रतिनिधींनी शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटीचीही राजकीय विश्लेषकांकडून विविध अंगांनी चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे, आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत याआधीही तर्कवितर्क लावले गेले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले होते.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव

तर दुसरीकडे संजय दिना पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या विविध तर्कवितर्कांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना ते कंटाळले असून कोणताही निर्णय झाला तर तो सर्वांसमोर स्पष्टपणे मांडला जाईल. पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांवर थेट भाष्य करण्याचे टाळले.

मोठी बातमी : ठाकरेंना दिल्लीत मोठा दणका; 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला ओम बिर्लांची मंजुरी?

राजकारणात विविध प्रकारच्या अफवा आणि दावे होत असतात, मात्र त्यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी सूचित केले. भविष्यात जे काही घडेल ते सर्वांसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटातील काही खासदारांच्या संभाव्य भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या सर्व चर्चा केवळ राजकीय तर्कवितर्कांच्या पातळीवरच असल्याचे मानले जात आहे.

 

follow us