Uddhav Thackeray : भाजपमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोकं… तिथे सगळे संधीसाधू दिसतात!

  • Written By: Published:
'आता भाजपमुक्त श्री'आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवरायांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही'; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं राम, मोदींची तुलना छत्रपती शिवरायांबरोबर शक्यच नाही'; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

रत्नागिरी (खेड) : कोरोनामुळे (Corona) अडीच वर्षे बाहेर पडलो नव्हतो. पण घरात बसून महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळला आहे. कारण ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं ब्रीद वाक्य होतं. त्यातच हक्का महाराष्ट्र समावला आहे. पण त्याचा अर्थ मिंधे गटाला काय समजणार आहे. हे उभा महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेत तर तो भजप हा पक्ष आहे. पूर्वी व्यासपीठावर साधू दिसायचे आता संधीसाधू दिसत आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, अशी जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मिंधे गटावर केली.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला.

Uddhav Thackeray : ढेकणं मारायला गोळीबार करायचा नाही… चिरडून टाकायची!

आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारे चौकशी होत नाही. फक्त त्यांना आपल्या पक्षात घेतले की त्यांचे सर्व पाप माफ होतात. मोतीबिंदू झाला असेल तर खेडमध्ये या आणि बघा काय आहे ते, कोणाच्या मागे जनता आहे ते, असा टोलाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाला लावला.

follow us