Aurangabad : विद्यापीठ, कॉलेज कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; परीक्षांवरही बहिष्कार

Untitled Design   2023 01 26T121147.317

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची (Strike)हाक दिली आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Higher and Technical Education)स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. बऱ्याचदा निवेदनं, भेटी, बैठका व आंदोलन होऊन देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं सांगितलं जातंय. विद्यापीठ (University) व महाविद्यालयीन कर्मचारी (College Employee) संयुक्त कृती समितीकडून 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर विद्यापीठं आणि महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या (Exam) कामकाजावर बहिष्कार (Boycott)टाकणार असल्याचा इशारा देखील दिलाय.

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीनं अनेक दिवसाच्या आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनकेदा प्रशासनाकडं निवदेनं देण्यात आली. याबद्दल अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं. त्यानंतरही प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

तीन वर्षांपासून या प्रलंबित मागण्यांसाठी सतत पाठपुरावा केला जातोय. तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय.

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीनं दिलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, सातव्या आयोगाप्रमाणं वेतन, आश्वासित प्रगती योजना यांसह विविध मागण्यांसाठी संपाची हाक त्यांच्याकडून देण्यात आली आहे. याचं निवेदन औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिवांना दिल्याची माहिती डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे.

Tags

follow us