राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस…, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra IMD Alert : राज्यातील वातावरणात बदल होत असल्याने सोमवारी आणि मंगळवारी तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज
Maharashtra IMD Alert : राज्यातील वातावरणात बदल होत असल्याने सोमवारी आणि मंगळवारी तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागानुसार (Maharashtra IMD Alert) , या जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी अहिल्यानगर (Ahilyanagar), धाराशिव, सांगली, बीड, सोलापूर आणि लातूरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्ये मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड
तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात अवकाळी पावसामुले पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहूसह अन्य पिकांचा नुकसान होऊ शकतो.
गुंतवणूकदार मालामाल; 500 रुपयांचा ‘हा’ शेअर पोहचला 3,700 वर, तीन वर्षात 600 % पेक्षा जास्त परतावा
