आवकाळी पावसाचा जोर वाढला; मराठवाड्यात फळबागांसह शेती पिकांचं अतोनात नुकसान
नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचं मोठं नुकसान केलं आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या (Rain) अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरत नाही तोच यंदाच्या अवकाळी पावसाने त्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे. मराठवाड्यात आंबा बागांसह, ताळींब, लिंब अशा अनेक बागांसह शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या असून गावरान आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील त्रिद्दी परिसरातही आंबा पिकाला फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील हळद पिक अवकाळी पावसामुळे भिजले असून अर्धापूर तालुक्यात हळदीसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचं मोठं नुकसान केलं आहे. सटाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुळे जिल्ह्यातील साखरी येथे पावसासोबत गारपीट झाल्याने कांदा, बाजरी, गहू आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कांदा व डाळिंबाला सर्वाधिक फटका
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा आणि डाळीय या पिकाना बसला आहे. 18 हजार 119 हेक्टरवरील कांदा पिके बाधित 1,858 हेक्टरवरील डाळींब फळबागांचे नुकसान गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून साठवणुकीवरही परिणाम होणार आहे. डाळीच फळबागांमध्ये फळगळ व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.