UPSC Exam Result : यूपीएससी परीक्षेत राज्यातील 70 हून अधिक विद्यार्थ्यांचा झेंडा…

UPSC Exam Result : यूपीएससी परीक्षेत राज्यातील 70 हून अधिक विद्यार्थ्यांचा झेंडा…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या ९३३ विद्यार्थ्यांपैकी १२ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. कश्मिरा संख्ये यांनी राज्यात पहिला तर देशात २५ व्या क्रमांकावर यश मिळवले आहे.

काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण

यूपीएससीचा २०२२ च्या मुख्य परिक्षेचा निकाला आज जाहीर करण्यात आला. निकालात पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील ७ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण ९३३ विद्यार्थ्यांपैकी ६१३ पुरुष आणि ३२० महिलांचा विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर १०१ विद्यार्थ्यांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे.

अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन करणं टाळलं, आता म्हणाले, ‘मी त्यांना भेटेन….’

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी :
अंकिता पवार (28), रूचा कुलकर्णी (54), आदिती वषर्णे (57), दिक्षिता जोशी (58), श्री.मालिये (60), वसंत दाभोळकर (76), प्रतिक जरड (112), जान्हवी साठे (127), गौरव कायंदे-पाटील (146), ऋषिकेश शिंदे (183), अर्पिता ठुबे (214), सोहम मनधरे (218), दिव्या गुंडे (265), तेजस अग्निहोत्री (266), अमर राऊत (277), अभिषेक दुधाळ (278), श्रुतिषा पाताडे (281), स्वप्निल पवार (287), हर्ष मंडलिक (310), हिमांषु सामंत (348), अनिकेत हिरडे (349), संकेत गरूड (370), ओमकार गुंडगे (380), परमानंद दराडे (393), मंगेश खिल्लारी (396), रेवैया डोंगरे (410), सागर खरडे (445), पल्लवी सांगळे (452), आशिष पाटील (463), अभिजित पाटील (470), शुभाली परिहार (473), शशिकांत नरवडे (493), रोहित कदम (517), शुभांगी केकण (530)

प्रशांत डगळे (535), लोकेश पाटील (552), ऋतविक कोत्ते (558), प्रतिक्षा कदम (560), मानसी साकोरे (563), सैय्यद मोहमद हुसेन (570), पराग सारस्वत (580), अमित उंदिरवडे (581), श्रुति कोकाटे (608), अनुराग घुगे (624), अक्षय नेरळे (635), प्रतिक कोरडे (638), करण मोरे (648), शिवम बुरघाटे (657), राहुल अतराम (663), गणपत यादव (665), केतकी बोरकर (666), प्रथम प्रधान (670), सुमेध जाधव (687), सागर देठे (691), शिवहर मोरे (693), स्वप्निल डोंगरे (707), दिपक कटवा (717), राजश्री देशमुख (719), महारुद्र भोर (750), अकिंत पाटील (762), विक्रम अहिरवार (790), विवेक सोनवणे (792), स्वप्निल सैदाने (799), सौरभ अहिरवार (803), गौरव अहिरवार (828), अभिजय पगारे (844), तुषार पवार (861), दयानंद तेंडोलकर (902), वैषाली धांडे (908), निहाल कोरे (922).

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये UPSC ची मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-मे 2023 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154,

तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41 दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. तसेच लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28, इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04 उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची, पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube