113 आमदार असताना मुख्यमंत्रीपद सोडलं… फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’

113 आमदार असताना मुख्यमंत्रीपद सोडलं… फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सत्तेसाठी तयार झालेलं सरकार नाही. सत्तेसाठी तयार झालं असतं तर 113 लोक आपल्याकडे होते. मी मुख्यमंत्री झालो असतो पण हे सरकार सत्तेसाठी तयार केलेलं नाही तर विचारांसाठी तयार केलेलं सरकार आहे. ज्यावेळी पक्षाने सांगितले की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. कारण आपल्याला विचार महत्वाचा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील जनतेने 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीला 165 पेक्षा जास्त जागा निवडून दिल्या होत्या. पण आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अधिक पसंत केली. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ पकडली. मागील अडीच वर्षे जुलमी राज्य पाहायला मिळाले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

‘भाकरी फिरली नाही, धूळफेक केली’; पवारांच्या निर्णयावर फडणवीसांचे एकाच वाक्यात उत्तर

ते पुढं म्हणाले की अडीच वर्षात उद्धव ठाकरे केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले, हे मी म्हणत नाही तर शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांनी पुस्तकात लिहिले की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले. यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. असं स्वत: शरद पवार यांनी सांगितले आहे, असं फडणवीस म्हणाले.

WTC Final : ICC ट्रॉफीचे स्वप्न अधुरेच, WTC मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी केला पराभव

एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचे नाही असा निर्णय त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की ज्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करील पण ह्यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही हा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार आणि 14 खासदार हे सत्ता सोडून विरोधी पक्षांकडे आले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे सरकार सत्तेत आले, असे फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube