शासन आपल्या दारी`त एका स्टेटसने खासदारासह प्रशासकीय यंत्रणेला फुटला घाम!

  • Written By: Published:
शासन आपल्या दारी`त एका स्टेटसने खासदारासह प्रशासकीय यंत्रणेला फुटला घाम!

बुलढाणा : राज्य सरकारचा सध्या चर्चेत असलेला कार्यक्रम शासन आपल्या दारी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पार पडला. राज्यात मराठा आंदोलनाचे लोण पसरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम घेतला. राज्यात अनेक ठिकाणी रास्ता-रोको झाला. काही ठिकाणी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ होत होती. अशा संकट काळात बुलढाणा येथील कार्यक्रम अधिकारी आणि पोलिसांची कसोटी घेणारा होता. मुख्यमंत्री यांचा कार्यकम पूर्वनियोजित होता. पण आंदोलनाची स्थिती पाहता संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात हजारो पोलीस आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. या कार्यक्रमाला ३० हजारहून लोक आले होते. या प्रत्येक व्यक्तीची तपासणीसाठी बंदोबस्तासाठी यंत्रणा तैनात होती. कोणी आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नये, यासारख्या अतिशय बारीक गोष्टीवर देखील पोलिसांचे लक्ष होते.

Dhangar Reservation : धनगर समाज आरक्षणासाठी उपोषणाला; रोहित पवारांनी घेतली आंदोलकांची भेट

सर्व काही सुरळीत झाले. नागरिक आप आपल्या जागेवर येऊन बसले होते. प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष होते. स्टेज हळूहळू खुर्च्या भरून लागल्या. मुख्यमंत्री यांना आणायला खासदार प्रतापराव जाधव यांचा ताफा निघाला. सभेसाठी खास निवेदिका बोलाविण्यात आला होत्या. त्यांनी हॅलो माईक टेस्टिंग सुरु केले. आयोजकांपैकी कुणाच्या तरी लक्षात आले निवेदिकेने मोबाईलवर मराठा आंदोलनाचे स्टेटस ठेवलेले होते. “ अब लेके रहंगे,” “ नही हटेंगे ‘ हे स्टेट्स बघून आयोजकांना तर घाम फुटला. पण सर्वाधिक घाम पोलिसाना फुटला होता. सर्व तपासण्या झाल्या सर्व काही सुरळीत होते. आणि ज्यांना स्टेजवर माईक दिला त्याच आंदोलनाच्या पुरस्कर्त्या निघाल्या. जर अचानक सभेत काही बोलल्या तर ? सर्वांची पळापळ सुरु झाली.


आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठासह धनगर, लिंगायत, मुस्लिम….; सुप्रिया सुळेंची मागणी

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी निवेदिकेची संपूर्ण तपासणी केली. मी व्यवसायाने निवेदिका आहे. माझ्या हातून चूक होणार नाही. स्टेट्सचा आणि माझ्या निवेदनाचा काही संबंध नाही. पण पोलिसांनी एेकले नाही. कार्यक्रम सुरू व्हायच्या दहा मिनिटे आधी नवीन निवेदक आणायचा कुठून हा देखील प्रश्न होता. त्याच निवेदिकेकडून चूक होणार नाही, अस लेखी लिहून घेण्यात आला. त्या निवेदिका जेव्हा जेव्हा माईकजवळ जात. तेव्हा तेव्हा एक महिला पोलीस अधिकारी त्यांच्या शेजारी उभी करण्यात आली. तिकडे खासदार यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर ते देखील चिंतेत होते.

अखेर मुख्यमंत्री व्यासपीठावर आले. मुख्यमंत्री यांचे भाषण सुरळीत झाले. मुख्यमंत्री हे भाषण संपणार तोच समोर एक शेतकरी उभा राहिला त्याने घोषणा देण्यासाठी हातवर केला. सर्व यंत्रणा चिंतेत आता हा काय घोषणा देणार? आंदोलनाची घोषणा दिली तर ? सर्व दोन दिवसांची मेहनत पाण्यात, या चिंतेत यंत्रणा असताना या शेतकऱ्याने घोषणा दिली साहेब एक रुपयात विमा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…. हे ऐकताच सर्व यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube