Video : मुंबईचा की नागपूरचा डोसा चांगला? आशिष देशमुखांशी देवेंद्र फडणवीसांची ‘खास’ चर्चा

Video : मुंबईचा की नागपूरचा डोसा चांगला? आशिष देशमुखांशी देवेंद्र फडणवीसांची ‘खास’ चर्चा

नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन होणार का? या चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (२० मे) देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट. यावेळी फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासाठी देशमुख यांनी नाष्ट्याचा खास बेत आखला होता. याच भेटीनंतर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule meet Ashish Deshmukh in Nagpur)

भेटीत खास चर्चा :

दरम्यान, या भेटीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशिष देशमुख यांनी मला बऱ्याच दिवसांपासून नाष्ट्याला बोलावलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे नाष्ट्यासाठी गेलो होतो. गप्पा मारल्या, चर्चा झाली, लगेच शेवटच्या निष्कर्षाला पोहचण्याचं कारण नाही. तर आज तर आम्ही नाष्ट्यावर चर्चा केलेली आहे, यात नागपूरचा डोसा चांगला की मुंबईचा डोसा चांगला वगैरे या सगळ्या गोष्टींची आमची चर्चा झाली. त्यामुळे तुम्ही अगदी टोक टाकू नका, असा सल्ला माध्यमांना दिला.

Nagpur : काँग्रेसच्या शिलेदारानं केलं फडणवीस, बावनकुळेंचं स्वागत; ‘खास’ नाष्ट्याचा आस्वाद घेत रंगवल्या चर्चा

या भेटीवर बोलताना देशमुख म्हणाले, मी काँग्रेसमध्येच आहे, मला दिलेल्या नोटिशीच सविस्तर उत्तर मी दिलं आहे. मला १०० टक्के खात्री आहे की काँग्रेस मला काढणार नाही. पण फडणवीस यांच्याशी माझे पक्षापलिकडील कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे ते आज नाष्ट्यासाठी आले होते. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ घेऊ नये. त्यांनी नाष्ट्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकात दाखवून दिलं, आता महाराष्ट्रातही तेच घडेल; अजितदादांनी सरकारला सुनावलं

फडणवीसांचे तोंड भरुन कौतुक :

दरम्यान, देशमुख यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, विदर्भाचा हित साधणारा महाराष्ट्रात कोणी नेता असेल तर ते आज देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या माध्यमातून विदर्भामध्ये विकासाचे चांगले कार्यक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. माझा पक्ष वेगळा असला तरी ते चांगले काम करत आहेत हे मी आवर्जून सांगतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube