प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञाचा स्वतःच्या रुग्णालयातच आढळला मृतदेह, चंद्रपुरात खळबळ
Chandrapur News : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर डॉ. उमेश अग्रवाल यांचे नेत्र चिकित्सालय आहे. काल रात्री 8.30 च्या दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी क्लिनिकच्या शौचालयात हेवी डोस इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.
डॉक्टरांनी इंजेक्शन घेतल्याचे कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी सायंकाळी काही रुग्णांची तपासणी केली आणि ऑपरेशन करून त्यांच्या दवाखान्याच्या विश्रामगृहात विश्रांती घेतली. त्यावेळी डॉ. अग्रवाल यांनी हेवी डोस इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असे त्यांच्या स्टाफकडून सांगण्यात येत आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप मृत्यूचे कारण सांगितले नाही.
ट्रकने चिरडून 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे पाच लाखांचे नुकसान
पोलिसांना घटनास्थळी इंजेक्शन आणि बाटली सापडली. डॉ उमेश अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात मानसिक उपचारही करण्यात आले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. डॉ. अग्रवाल यांच्या पत्नी देखील ख्यातनाम डेंटिस्ट आहेत. तर मुलगा डॉक्टरकीच्या अंतिम वर्षाला आहे.