समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

  • Written By: Published:
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

बुलढाणा : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उदघाट्न झाल्यापासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज सकाळी या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते मेहकरदरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कार उलटून झाला आहे हि कार छत्रपती संभाजीनगर वरून शेगावला जात होती. हा अपघात एवढा भीषण होता की अर्टिका गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये एक लहान मुलांसह चार महिलांचा आणि ड्राइवरचा समावेश आहे. झोपेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. हा अपघात सकाळी 7 वाजता झाला. या अपघातानंतर लवकर मदत मिळाली नसल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत. जवळपास पाऊण तास कोणतीही मदत त्यांना मिळू शकली नाही. हा महामार्ग नवीन असल्यामुळे तेथे अद्याप जवळपास कुठली मदतकेंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.

हा महामार्ग ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे या महामार्गावर गाड्या प्रचंड वेगाने सुसाट सुटतात आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटते आणि भीषण अपघात होतात.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube