नितीन देशमुखांनी ठाकरेंनाही मागे टाकलं, बावनकुळे-फडणवीसांवर केली जहरी टीका…
Mla Nitin Deshmukh News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका करण्यामध्ये उद्धव ठाकरेंनाही मागे टाकलं आहे. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. जो मतिमंद आहे त्याला दुसऱ्यांची काय पारख? असा सवाल करीत देशमुखांनी बावनकुळेंचा समाचार घेतलाय तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला गद्दारांचा, भ्रष्टाचार आणि ईडीचा कलंक लावल्याची जहरी टीका नितीन देशमुख यांनी केली आहे.
फोडाफोडी झाली असेल तर आता… रोहित पवारांचा फडणवीसांसह अजितदादांना खोचक सल्ला
उद्धव ठाकरे यांनी नागपुरच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांचा ‘कलंक’ उल्लेख केला होता. त्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधून प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
तटकरेंनी रायगड सोडून बोलावं; पालकमंत्री फक्त ‘भरतशेठ’ होणार! गोगावलेंनी थोपटले दंड
पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे स्वत: मतिमंद आहे, त्यांना दुसऱ्याची काय पारख असणार आहे. मतिमंद माणसाला काय समजणार की कोणाचं संतुलन बिघडलंय? असा सवाल करीत त्यांनी बावनकुळेंवर प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राला कलंक लावला असल्याचं म्हणत टीका केली होती.
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : 2000 रुपयांच्या नोटा बदलताना ओळखपत्र किती आवश्यक?
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर लगेचच फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ‘कलंकीचा काविळ’ असं शिर्षक देत उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप-प्रत्यारोपासह टीका केली होती. त्यावरुन आता देशमुखांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. देशमुख म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला गद्दारांचा, भ्रष्टाचाराचा, ईडीचा कलंक लावला आहे, यामागे भाजप असून त्याचा मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच राष्ट्रवादीच्या फुटीआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यामध्ये सिंचन घोटाळा, उत्खनन, बॅंक घोटाळ्याचा समावेश असल्याचं मोदी म्हणाले होते, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपने त्यांना सरकारमध्ये घेत शपथविधी घेतला आहे, याला काय म्हणायचं याचा खुलासा मोदींनी करावा, असंही ते म्हणाले आहेत.