‘कोणाला सांगितलंस तर हात-पाय तोडीन’; 8 वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याचे अत्याचार, नागपुरात 60 वर्षीय आरोपीला अटक

Nagpur Minor Girl Sexual Assault: नागपूर शहरात आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nagpur Minor Girl Sexual Assault: नागपूर शहरात आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nagpur Minor Girl Sexual Assault: नागपूर शहरात आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या मुलीला शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, याबाबत कोणाला सांगितल्यास हात-पाय तोडण्याची धमकीही आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, अखेर तिने आईला सर्वकाही सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पाच लाख घेऊन लग्नाचा बनाव, माप ओलांडताच नवरी पसार! तरुण शेतकऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासोबत राहते. याच परिसरात नेहरू मारुती पाचरे (वय 60) हा आरोपीही राहतो. मुलीच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख असल्याने त्याच्यावर घरच्यांचा विश्वास होता. याचाच गैरफायदा घेत त्याने मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर आरोपीने मुलीला कोणालाही काही सांगू नकोस, अन्यथा हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे चिमुरडी प्रचंड घाबरली होती. आरोपीने यापूर्वीही अनेकदा तिच्यासोबत अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. धमकीमुळे मुलगी बराच काळ शांत राहिली. मात्र, अखेर तिने धाडस करून आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

मला आता निर्णय आणि टाइमलाईन पाहिजे! बाबासाहेबांच्या स्मारकावरून फडणवीस आक्रमक

मुलीच्या तोंडून संपूर्ण घटना समजल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नेहरू मारुती पाचरे याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीने यापूर्वीही मुलीसोबत असे प्रकार केले होते का, तसेच धमकी देऊन त्याने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास पोलीस करत आहेत. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राहुल गांधी चेन्नईत दाखल; डिलिमिटेशनवरून स्टॅलिन यांची घेणार भेट, द्रमुक नेते म्हणाले, ‘आता खूप उशीर झालाय!’

follow us