कॉंग्रेसच्या अमित झनकांनी गड राखला, भावना गवळींचा केला दारूण पराभव…

  • Written By: Published:
कॉंग्रेसच्या अमित झनकांनी गड राखला, भावना गवळींचा केला दारूण पराभव…

Risod Assembly Election Result 2024: कॉंग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखला जात असलेला रिसोड मतदारसंघ कॉंग्रेसच्या खाती कायम राहीला आहे. रिसोड मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे अमित झनक (Ameet Zanak) विजयी झालेत. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी यांचा दारूण पराभव केला.

महायुतीला संपूर्ण राज्यात यश मिळत असताना रिसोड विधानसभा मतदारसंघात भावना गवळींचा पराभव शिंदे सेनेसाठी मोठा धक्का आहे.  इथून काँग्रेसचे अमित झनक सलग चौथ्यांदा निवडून आले. तर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

Chagan Bhujbal : येवल्याचा मीच ‘किंग’; छगन भुजबळांनी सिद्ध करुन दाखवलं… 

रिसोड हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून झनक घराण्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. सुरूवातीच्या काही कलांमध्ये अमित झनक हे पिछाडीवर आहेत. मात्र, नंतरच्या कलांमध्ये झनक यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांचा विजय झाला. अमित झनकांनी 6700 मतांनी भावना गवळींचा पराभव केला.

अमित झनक यांना अंतिम फेरित 77 हजार 352 मते मिळाली तर भावना गवळींना 60 हजार 469 इतकी मते मिळाली.

अमित झनक सलग चौथ्यांदा विजयी… 

रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2009 पासून काँग्रेसने रिसोडमध्ये सलग विजय मिळवला आहे. 2009 च्या निवडणुकीत सुभाषराव झनकांनी 51,234 मते मिळवत विजय मिवळला होता. तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही अमित झनक यांनी काँग्रेसची परंपरा कायम ठेवली होती. 2019 मध्ये झनक यांनी अनंतराव विठ्ठलराव देशमुख यांचा पराभव केला

महायुतीची 232 जागांवर आघाडीवर
आतापर्यंत महायुती तब्बल 232 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 135 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 56 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube