कॉंग्रेसच्या पराभवासाठी चंद्रपुरसारखी दुसरी कोणती भूमी नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य

कॉंग्रेसच्या पराभवासाठी चंद्रपुरसारखी दुसरी कोणती भूमी नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य

चंद्रपूर : सी फॉर कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी सी फॉर चंद्रपुरसारखी दुसरी कोणती भूमी असू शकत नसल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. आज चंद्रपुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुनगंटीवार बोलत होते.

ते म्हणाले, आरपार रावणला पराभूत करायचं असेल तर आरपार रामापासून गोष्ट सुरु होते. कंसाला युध्दात पराभूत करायचं असेल तर कृष्णाला मैदानात उतरावं लागणार आहे. तर मग सी फॉर कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी सी फॉर चंद्रपुरसारखी भूमी दुसरी कोणती असू शकत नसल्याचंही त्यांनी म्हंटलय.

तसेच चंद्रपुरची लोकसभेची जागा भाजप जिंकू शकली नसल्याची आपल्या मनात खंत असून चंद्रपुरच्या जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून दिलंय. आगामी काळातील निवडणुकांमध्ये सत्याचा विजय होऊन भाजपच विजय होणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, चंद्रपुर जिल्हा ही पराक्रम्यांची भूमी असून पंडीत जवाहरलाल नेहरुंनी जेव्हा सुवर्णदानासाठी आवाहन केलं त्यावेळी सर्वाधिक सुवर्णदान याच चंद्रपुर जिल्ह्यातून झालं असल्याचं त्यांनी म्हंटलंय. आरपार रावणाला पराभूत करायचं असेल तर आरपार प्रभू रामचंद्रापासून गोष्ट सुरु होत असल्याचं वक्तव्य करत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

या सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरणार असून आगामी निवडणुकांसदर्भातील रणनीती आखण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चंद्रपुरसह संभाजीनगरला देखील जे.पी. नड्डा यांचा दौरा होणार असून संभाजीनगरमध्ये देखील त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नड्डा यांचा हा संभाजीनगरमधील पहिलाचं दौरा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच तयारीला सुरू झाली असून यासाठी भाजपकडून स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी एकापाठोपाठ बैठका सुरु आहेत. याच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे.पी. नड्डा येथील जाहीर सभेतून फुंकणार असल्याची माहिती मिळतेयं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube