शेतकऱ्यांची घरं सांभाळा, दुसऱ्यांचे घरं का फोडता? ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरु आहेत. पात्र-अपात्र करत शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदत मिळाली नाही. ह्यांच्या गैरकारभारामुळे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या घराकडे बघायला वेळ नाही. पण दुसऱ्यांची घर फोडत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे घर सांभाळण्याची हिम्मत भाजपमध्ये नाही पण दुसऱ्याची घरं फोडण्याचा विकृतपणा भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथील मेळाव्यातून केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की मी काँग्रेससोबत गेलो कारण तुम्ही आम्हाला ठकललं. गेली 25 वर्षे आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्यासोबत राहिलो आणि असे काय घडले की तुम्ही आम्हाला सोडून दिलं. आता तुम्ही कोणासोबत गेले तरी चालतं. मेहबुबा मुफ्तीसोबत भाजप गेलेले चालतं, राष्ट्रवादीसोबत भाजप गेले तरी चालतं पण शिवसेनेने कुठं जायचं नाही. हे बेगडी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मतदान कोणाला ही द्या, सरकार आमचंच येणार; ठाकरेंचा भाजपला टोला
काहींच्या ईडी, सीबीआयची चौकशी सुरु केल्या. पण आता ते भाजपसोबत गेले तर त्यांच्या चौकशा थांबल्या आहेत. त्या चौकशांचं काय झालं? भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांचं पुढं काय झालं? हा जाब विचारण्यासाठी आरोप करणाऱ्या दलालाच्या घरी शिवसैनिकांना पाठवणार आहे. आता आम्हाला मार्ग दाखव की ह्या लोकांवर असे काय शिंपडले की ते धवून स्वच्छ झाले आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
अजितदादांनी बंड केलं पण, पडद्यामागं काय शिजलं? चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा
बंजारा समाचाजी काशी असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांनीही जय्यत तयारी केली आहे.