Video: आता गुन्ह्यातील पुरावा टेम्पर करणं अवघड; आरोपींना घाम फोडणारी यंत्रणा फडणवीसांकडून लॉन्च

  • Written By: Published:
Video: आता गुन्ह्यातील पुरावा टेम्पर करणं अवघड; आरोपींना घाम फोडणारी यंत्रणा फडणवीसांकडून लॉन्च

मुंबई : एखादी गुन्हेगारीची घटना घडल्यानंतर त्याच्या शेवटापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्याचा छडा लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कंबर कसली आहे. गुन्ह्यातील (Crime) आरोपींपर्यंत पोहचवण्यासाठी आणि आवश्यक पुरावे गोळा करणाऱ्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे एकत्र गोळा करण्यास आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे असे फडणवीसांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis On Mobile Forensic Van)

‘लाडक्या बहि‍णीं’मुळे तिजोरीत खडखडाट, सरकारचं मोठं नुकसान; SBI नं दिला गंभीर इशारा

व्हॅनमध्ये उपस्थित असणार तज्ज्ञ व्यक्ती 

फडणवीस म्हणाले की, देशामध्ये केंद्र सरकारने नवीन भारतीय साक्ष अधिनियल लागू केलेला आहे. या कायद्याने साक्ष गोळा करणे. त्याची व्यवस्था योग्यप्रकारे करणं. एखाद्या गुन्ह्यातील पुरावे गोळा करणे ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवणे यासाठी काही नवीन नियम सुरू केले आहेत. त्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने याला अनुकुल अशा मोबाईल फॉरेनसिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे. तसेच यात एक सायंटिफिक एक्सपर्ट आणि केमिकल एक्सपर्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे ते उपस्थित असणार आहे.

जागेवरचं होणार टेस्टिंग 

गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तेथील जो पुरावा आहे तो ते जमा करतील. यामध्ये ब्लड सॅम्पल, नार्कोटिक, स्फोटाचे सॅम्पल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुरावे असतील या प्रत्येकाचे जागेवर टेस्टिंग करण्याचे कीट या व्हॅन्समध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुरावे नाही म्हणून जे काही गुन्हेगार सुटताना दिसतात तसे यामध्ये होणार नाही. तर, यातील किट्सच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना प्राथमिक निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्षदेखील काढता येईल.

‘बुढ्ढे ड्युटी करनी आती क्या?, 2 तासांत सस्पेंड करतो’, पोलिसांना धमकी देणाऱ्या बाकलीवालला मोठा दणका

ब्लॉगचेनमुळे कुणालाही पुरावा टॅम्पर करता येणार नाही

यासोबतच यातील वेगवेगळ्या इक्विपमेंटमधून जे काही पुरावे जमा होतील. ते कशाप्रकारे जतन करायचे त्याकरता ब्लॉगचेनची पद्धती तयार करण्यात आलेली आहे. यामुळे अनेकवेळा आपण पाहतो की, कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी संबंधित घटनेतील आरोपी सुटतो आणि लक्षात येत की, जो काही पुरावा आहे तो बदलला, टॅम्पर झालेला किंवा त्यात अडचणी आहेत. मात्र, ब्लॉगचेन पद्धतीमुळे कुणालाही पुरावा टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे असेल असे फडणवीसांनी सांगितले.

सर्व व्हॅन्समध्ये CCTV

लोकार्पण करण्यात आलेल्या सर्व व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही, फ्रिज देखील बसवण्यात आले आहे. यामुळे ज्या तापमानावर पुरावे, यंत्र किंवा परिक्षण करण्याचे केमिकल्स ठेवायची आहेत ते ठेवता येणार आहेत. एवढेच नव्हे तर, सगळं योग्यप्रकारे सील होतयं की नाही हे कॅमेरांमुळे पाहता येणार आहे. तसेच घटनेच्या ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीदेखील करता येणार आहे. यामुळे घडलेले गुन्हे उघडकीस येणं आणि आरोपींना शिक्षा होणं या दोन्हीमध्ये एक गुणात्मक बदल होणं पाहण्यास मिळेल असा विश्वास फडणवीसांना व्यक्त केला. जवळपास 256 व्हॅन्स तयार केल्या जाणार असून, त्यातील 21 व्हॅन्स रोलआऊट केल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube