राहुल गांधींना महिलांचा अपमान करण्याचा छंद; गोल्ड मेडलही त्यांनाच मिळेल, फडणवीसांनी वात पेटवली

Rahul Gandhi नारी शक्ती वंदन कायदा नामंजूर होताच मोदींनी देशाची आणि करोडो महिलांची माफी मागावी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Rahul Gandhi

Devendra Fadnavis On Rahul Gandhi :  नारी शक्ती वंदन कायदा संसदेत नामंजूर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आणि करोडो महिलांची माफी मागावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांना महिलांचा अपमान करण्याचा छंद असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. एखादा किती खोटं बोलू शकतो याची जर ऑलिंपिक स्पर्धा घेतली तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधीं यांनाच सर्व गोल्ड मेडल मिळतील असा दावाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

एक कोटी सह्यांद्वारे जनमत तयार करू, महिला आरक्षणासाठी सर्व महिलांना एकत्र येण्याचं फडणवीस यांचं आवाहन

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधींच्या माफी मागण्याच्या विधानावर फडणवीस म्हणाले की, एखादा किती खोटं बोलू शकतो याची जर ऑलिंपिक स्पर्धा घेतली तर, मी तुम्हाला सांगतो राहुल गांधीं यांनाच सर्व गोल्ड मेडलं मिळले असते. आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्या संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला रिप्रेझेंटेशन करता चिंतेत होते आणि आग्रही होते पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचा आरक्षण करावं असा विषय आला नाही पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती  असे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधींनी साष्टांग घालावा पण…

आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहे त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकला म्हणायचं, खरं म्हणजे संविधानकरांच्या विचारांवरील एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे. महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचे काम त्यांनी केलंय, त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही. कारण ते मागणारच नाही मला माहिती आहे. त्यांना महिलांचा अपमान करणं समाजातल्या इतर घटकांचा अपमान करण हा छंद आहे. खरं म्हणजे त्यांनी तर, साष्टांग दंडवत घालून  महिलांची माफी मागितली पाहिजे पण ते तसं करणार नाही कारण त्यांचा तो स्वभाव असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

follow us