अखेर न्याय मिळाला; मालेगावच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशी!
Malegaon Dongrale Child Sexual Assault and Murder Case; बालिकेवरील अत्याचाराप्रकरणी आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Vijay Khairnar sentenced to death in the Malegaon child sexual assault and murder case: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विजय खैरनार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जलदगती न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निकालाच्या वेळी मालेगाव न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका! SEBI चे निर्बंध लागू, काय परिणाम होणार?
काही तासांत आरोपीला अटक, तीन आठवड्यांत दोषारोपपत्र
गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून आरोपी विजय खैरनारने साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. आरोपी विजयला भर चौकात फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.
विद्युत जामवालने दिलेला शब्द पाळला; रोमन रेंसचा भारतीय चाहत्यांसाठी खास संदेश
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करत काही तासांतच गावातील विजय खैरनार याला अटक केली. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गेल्या 11 महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती. अखेर शुक्रवारी (16 ऑक्टोबर) न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.
उज्ज्वल निकम यांचा सरकारी पक्षाकडून युक्तिवाद
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडताना त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या कामात ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी त्यांना सहकार्य केले.
पालकांनो लक्ष द्या! शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; शासनाचा GR निघाला….
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 24 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अटकेनंतर विजय खैरनार कारागृहात होता. प्रत्येक सुनावणीवेळी लोकांचा आक्रोश आणि सुरक्षेचा विचार करून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जात होते. अंतिम निकालाच्या दिवशीही त्याची हजेरी याच पद्धतीने लावण्यात आली.
फाशीच्या शिक्षेसह सात वर्षांचा कारावास
बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावली.
पुण्यातील आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच मालेगाव न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हेही निकालाच्या वेळी न्यायालयात उपस्थित होते. या निकालामुळे अत्याचार झालेल्या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला.