विजय शिवतारेंचं धमाकेदार भाषण चर्चेत; विड्या ओढण्यापासून ते गुर वळण्यापर्यंतचे सांगितले भन्नाट किस्से

विजय शिवतारेंचं धमाकेदार भाषण चर्चेत; विड्या ओढण्यापासून ते गुर वळण्यापर्यंतचे सांगितले भन्नाट किस्से

Vijay Shivatare : बारामती लोकसभा लढवण्यासाठी दंड थोपाटल्यानंतर चर्चेत आलेले विजय शिवतारे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सासवड यथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Vijay Shivatare) त्या कार्यक्रमात बोलताना शिवतारेंनी जुन्या आठवणींना चांगलीच वाट मोकळी करून दिली. (Accident) यावेळी त्यांनी काही आठवणी तर काही किस्से सांगितले.

चक्कर येऊन पडायचो

लहानपणी मी खूप वांड होतो, प्रचंड बंडखोर, प्रचंड म्हणजे प्रचंड. चौथीत असताना विड्या ओढायचो अशी अठवण सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी जे तुम्हाला माझ्या लहाणपणीच्या आठवणी सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, हे खर आहे. मी गुरं वळायला जायचो, गुरं सोडायची, चालत हरकुळला जायचं, आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे आणि विडीचं बंड आणायचं. दोन, चार विड्या प्यायलो की चक्कर येऊन पडायचो असा मजेदा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

शाळेत माझं नाव आहे Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

बंडखोर असलो तरीही मी बंडखोर होतो, मस्तीखोर होतो तरीही पहिल्या क्रमांकावर होतो. मी अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आत्ताही शाळेत गेलात तरीही माझं नाव आहे. माझा हजेरी क्रमांक असा होता ना की, एक दिवस डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो होतो असंही शिवतारे यावेळी म्हणाले आहेत.

लोकसभेतून माघार घेतली पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत रंगली होती. अजित पवारांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या विजय शिवतारेंनी बारामती निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. त्यानंतर अजित पवारांचं चांगलच टेन्शन वाढलं होतं. वारंवार शिवतारे आपण निवडणूक लढवणार म्हणून सांगत होते. परंतु, अजित पवारांनी सर्व गणितं जुळवून शिवतारेंसोबत तह केला आणि शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली. त्या दरम्यान, शिवतारे चांगरेच चर्चेत आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube