पाथर्डी नगरपरिषद निवडणूकीत 23 हजार 242 मतदारांसाठी 27 केंद्रांवर मतदान

Pathardi Municipal Council Elections : राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या निर्देशानुसार पाथर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक

  • Written By: Published:
Pathardi Municipal Council Elections

Pathardi Municipal Council Elections : राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या निर्देशानुसार पाथर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण २३ हजार २४२ मतदारांसाठी २७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, अर्ज स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया वीर सावरकर मैदान परिसरातील नव्या नगरपरिषद इमारतीत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

या निवडणुकीत प्रथमच सर्व प्रक्रिया तहसील कार्यालयाऐवजी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीत होणार आहे. या ठिकाणी १० नोव्हेंबरपासून “एक खिडकी योजना” अंतर्गत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व परवानग्या मिळणार आहेत. या खिडकीत पोलीस, वाहतूक तसेच नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहून मेळावे, सभा, प्रचारफेरी, वाहन वापर, ध्वनिक्षेपक, फ्लेक्स-बोर्ड, प्रचारपत्रके आदींसाठी आवश्यक परवानग्या देतील.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव नाईक, मुख्याधिकारी सपना वसावा आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते. प्रांताधिकारी मते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार असून रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत.

नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० अशी राहील. प्राप्त अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. वैध अर्जदारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत १९ ते २१ नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजेपर्यंत राहील. माघारीनंतर उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहील. त्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार असून तीही नगरपरिषदेच्या नव्या इमारतीतच पार पडेल.

उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी १००० रुपये तर अनुसूचित जाती उमेदवारांसाठी ५०० रुपये इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक, तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक आवश्यक असतील. अर्जदार व सूचक यांच्यावर कोणताही करथकबाकी नसावी. नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा ७ लाख ५० हजार तर नगरसेवक पदासाठी २ लाख ५० हजार निश्चित आहे.

नगर–मनमाड महामार्ग विकासकामांसाठी 4.68 कोटींचा निधी; खासदार लंकेंच्या पाठपुराव्याला यश

उमेदवारांना मालमत्ता व गुन्हेगारी संदर्भातील दोन स्वतंत्र हमीपत्र सादर करावे लागतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी नगरपरिषद क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ती प्रभावी राहील. प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना आचारसंहितेचे पालन करून निवडणूक शांततेत व पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.

follow us