आम्ही बाळासाहेबांची शिवसेना…, उद्योगमंत्री सामंतांनी ठणकावून सांगितलं

आम्ही बाळासाहेबांची शिवसेना…, उद्योगमंत्री सामंतांनी ठणकावून सांगितलं

औरंगाबाद : आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचं शिंदे-फडणवीस सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलंय.

तसेच निवडणूक आयोगाने आम्हांला बाळासाहेबांची शिवसेना नावाने मान्यता दिली असून आम्ही म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असंही ते म्हणाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या गटातील आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा उल्लेख केला जात आहे.

संजय राऊत यांनी अशाच पत्रकार परिषद घ्याव्यात, नाहीतर राज्यातील मनोरंजन क्षेत्र राज्याबाहेर जाईल, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे, मात्र, अशा टीका संजय राऊत नेहमीच करतात, महिलांबाबत बोलणारे, आमचे मुडदे पाडू असं बोलणाऱ्या राऊत यांच्याबाबत काय बोलावं, पुढील पंचवीस वर्षे ते असेच बोलत राहावे, अशी सदिच्छा म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

तर बुधवारी दिवसभर अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत दोन वेगळे वक्तव्य पाहायला मिळाल्या. त्यामधे देशाचे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि अजित पवार आपल्या मतावर ठाम राहणे हे पाहून तुम्हाला लक्षात येईल, अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली. मसिया तर्फे शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आयोजित होते. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असला तरी शेवटच्या दिवशी ते येऊ शकतात, अशी शक्यता उदय सामंत यांनी वर्तवली. उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री संदीपान भूमरे, मंत्री अतुल सावे, अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube