पोलिसांनी कृष्णा आंधळेला का आश्रय दिला?; तो तुमचा मित्र होता का?, धनंजय देशमुख का संतापले?

Dhananjay Deshmukh on Beed Police : संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण होऊन दोन महिने झाले असून अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही. संतोष देशमुख (Beed ) हत्या प्रकरणामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, अद्याप एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी यासाठी मस्साजोग गावाच्या लोकांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे.
…तर पाण्याचा घोटही घेणार नाहीत; मस्साजोगच्या ग्रामस्थांचं पाऊल, आजपासून अन्नत्याग आंदोलन
बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावी. अशी मागणी मस्साजोग गावाचे लोक करत आहेत. न्यायासाठी मस्साजोग गावकरांनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे. धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडमधील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
मस्साजोग गावातील लोकांनी न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, स्थानिक पोलीस स्टेशनने सीआयडीकडे काय तपास दिला? तो योग्य आहे का..? सीआयडी सोसायटी चांगल्या दिशेने तपास करत आहेत. परंतु, बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही. त्यावर आम्ही चर्चा केली धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे.
यामध्ये SP यांनी याबाबतची कुठलीही माहिती पुरवली गेली नव्हती. सहा डिसेंबर रोजी का ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही.सगळे गुन्हे दाखल झाले ते वेळ निघून गेल्यावर झाले. पोलिसांनी कृष्णा आंधळेला का आश्रय दिला होता. लोकांचे खून करण्यासाठी. अपहरण करण्यासाठी? त्याला पोलिसांनी मित्र बनवलं होतं का? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही आंदोलनावर ठाम आहोत गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत. दोन दिवस हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर अन्नपान देखील घेणार नाहीत. सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहेत. ते कशा पद्धतीने काम करत आहेत ही माहिती आम्हाला नाही. केज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगायला हवं होतं की यापूर्वीच्या तपास कशा पद्धतीने झाला आहे असंही ते म्हणाले.