नगर हादरलं! घरातून सात लाख लुटून व्यावसायिकाचा खून, पत्नीना जबर मारहाण
अहमदनगर – दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगावमध्ये चोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतांनाच आता याच घटनेची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करत घरातून लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे. व्यावसायिक नईम रशीद पठाण (Naeem Rashid Pathan) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0
याबाबत अधिक माहिती अशी, नईम पठाण हे व्यावसायिक असून त्यांनी जागेच्या व्यवहारासाठी घरामध्ये सात लाख रुपये आणले होते. कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. बुधवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास नईम यांच्या पत्नी बुशरा यांनी घराबाहेरील बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच चोर घरात शिरले व त्यांनी नईम आणि त्यांची पत्नी बुशरा यांना जबर मारहाण केली. चोरांच्या केलेल्या या जबर मारहाणीत नईम पठाण यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.
‘आदित्य ठाकरेंनी ठरवलं अन् केसरकरांना गेला कार्यकर्त्यांचा फोन’; कोकणात नेमकं काय घडलं?
धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी घरातील एका ओढणीने नईम यांच्या गळ्याला फास टाकला व त्यांचा खून केला. चोरांनी पठाण यांच्या पत्नीला मारहाण करत घरातील सात लाख रुपये घेऊन पळ काढला. चोरींनी केलेल्या मारहाणीत बुशरा गंभीर जखमी झाल्या आहे. सध्या त्यांना रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणाचा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत आहे.