Wife Murder : दारुच्या नशेत पतीने पत्नीला संपवलं, नंतर पतीने बाथरुममध्ये….
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरात बाथरुममध्ये ठेऊन गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय.
CBSE Exam Result 2023 : लवकरच जाहीर होणार दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल, इथे पाहा
संदीप रामचंद्र गुजर (वय ५३ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी आशा संदीप गुजर (वय ५० वर्ष, दोन्ही राहणार आयकॉन पब्लिक स्कूल जवळ, शिवनेरी चौक,स्टेशन रोड अहमदनगर) हिचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रात्रीच्या सुमारास जेवतानाच पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला होता. पती-पत्नीच्या वादानंतर पती संदीप गुजर याने पत्नी आशा संदीप गुजर हिच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. त्यानंतर पत्नी आशाचा मृत्यू झाला. वार केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती संदीपने पत्नीचा मृतदेह घरातील बाथरुममध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर दारुच्या नशेत असताना संदीपने स्वयंपाक घरात जात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केलीय.
पवारांच्या पुस्तकातील ‘या’ मजकुरामुळे ठाकरेंची कोंडी, राऊतांनी घेतली पवारांविरुध्द भूमिका
संदीपने आत्महत्या केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी आसपास राहणाऱ्या नागरिकांना घराच्या खिडकीतून निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Sharad Pawar Retirement : पवारसाहेब, निवृत्त व्हा… पण १६ महिन्यानंतर…
घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो दरवाजा तोडण्यात आला. घरातील किचनमध्ये संदीप गुजर याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. तसेच समोरच्या रुममध्ये रक्त सांडलेले दिसून आले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता बाथरुममध्ये पत्नी आशा मृत अवस्थेत आढळून आली.
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा, VIDEO समोर
दरम्यान, पती आणि पत्नीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून याबाबत अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत. या गुजर दाम्प्त्याच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.