पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे मटेरियल नाहीत, अतुलबाबांना आमदार करा; फडणवीसांचे आवाहन
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियलच नाहीत. ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, अशी टीका करत अब हवाओ का रूक बदल चुका है, 23 तारखेला दक्षिण कराडचे आमदार अतुलबाबाच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
डॉ. अतुलबाबा भोसलेंसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, शुक्रवारी मलकापुरात घेणार जाहीर सभा
महायुतीचे उमेदवार अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी उदयनराजे भोसले, सुरेशबाबा भोलले, भगवंत खु्बाजी, अतुलबाबा भोसले, आनंदराव पाटील, रोहिनीताई शिंदे, सुलोचना पवार, एकनाथ बागडे, अशोक थोरात, वसंतराव शिंदे, राजेंद्र माने, विक्रम चव्हाण, सोमनाथ धुमाळ आदी नेते उपस्थित होते.
माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले
यावेळी माझ्या तमाम लाडक्या बहिणांनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो असं म्हणत फडणवीसांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, सगळ्या लाडक्या बहिणींचा आशिर्वाद आमच्यासोबत आहे, त्यामुळंच मी इथं उभा आहे. आजची सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे. अब, हवाओ का रूक बदल चुका है, 23 तारखेला दक्षिण कराडचे आमदार अतुलबाबा भोसलेच होणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज बाबा विधानसभेचे मटेरियलच नाहीत
यावेळी फडणवीस यांनी कॉंग्रेस उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली. पृथ्वीराज बाबा विधानसभेचे मटेरियलच नाहीत. ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. तुम्ही आपलं त्यांना इथंच अडवून ठेवता. विधानसभेत पाठवता. विधानसभेत तरूण, तडफदार, उमदा, तुमच्यासाठी झटणारा आमदार पाठवला पाहिजे. आता कराडचा फैसला झाला, कराडकर अतुलाबाबांना विधानसभेत पाठवतील, असं फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले, अतुलबाबा कराडमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातून जनसामान्यांना कायम मदत करत आले. कुणी आजारी पडलं, तर इथल्या लोकांसाठी कृष्णा हॉस्पिटल आहे, शिक्षण घ्यायचं असेल तर कृष्णा परिवाराच्या शिक्षण संस्था आहेत. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अतुलबाबांनी काही ना काही केलं. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटल नसतं तर सातारा, सांगलीच काय झालं असतं? कोरोना काळात 9 हजार जीव कृष्णा हॉस्पीटलमुळे वाचले. कुठल्याही पदावर नसतांना हे काम अतुलबाबा करू शकतात, अतुलबाब आमदार नव्हते, खासदार नव्हते तरीही त्यांनी 473 कोटींचे रस्ते मंजूर करून आणले. खाशाबा जाधव कुस्ती सुंकलाला 35 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, असं फडणवीस म्हणाले.
पृथ्वीराजबाबांनी फुटकी कवडीही दिली नाही…
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विकास होत नाही, अशी तक्रार अतुलबाबांनी माझ्याजवळ केली. त्याक्षणी मी स्टेडिमयमल शंभर कोटी रुपये दिले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी साधी फुटकी कवडीही दिली नाही, अशी टीका करत आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही, असं फडणवीस म्हणाले.
हायवेवरचा पूल आम्ही मंजूर केला असं पृथ्वीराज चव्हाण सांगतात, मात्र, केंद्र सरकारने पैसा दिल्यानं हा ब्रीज झला. मात्र, विरोधकांची फुकटचं श्रेय घेण्याची वृत्ती आहे, असा हल्लाबोलही फडणवीसांनी केला.