सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी धडकेबाज अधिकारी दिलीप पवार यांची नियुक्ती
Solapur-Solapur-पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहे. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा बजाविली आहे.
सोलापूर: सोलापूर शहरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. सोलापूर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी धडकेबाज अधिकारी दिलीप पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिलीप पवार हे राज्यातील गाजलेले अधिकारी आहेत. अनेक जटील गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत. या कामगिरीबद्दल बाराशेहून अधिक बक्षीसे त्यांना मिळाली आहे. त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक मिळालेले आहेत. (Dilip Pawar appointed as Assistant Commissioner of Solapur Crime Branch)
पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहे. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा बजाविली आहे. श्रीरामपूरसारख्या संवेदनशील शहरात ते अधिकारी होते. तसेच अहिल्यानगरच्या स्थानिक शाखेचे प्रमुख होते. त्यावेळी दरोड्याखोरांच्या अनेक टोळ्या त्यांनी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे दरोड्यासारखे गंभीर गुन्हे आटोक्यात आणले होते. नगर जिल्ह्यात सराफ व्यावसायिकांवर दरोडे पडत होते. हे दरोडे रोखण्यात पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील रस्ता लुटीच्या घटनांना त्यांनी आळा घातला होता. याचबरोबर ठाणे, पुणे ग्रामीण, कोल्हापूर शहरात त्यांनी सेवा बजाविलेली आहे.
डॉक्टर खंडेवाल दरोडा प्रकरणात केंद्रीय पदक
लोणावळ्यातील गाजलेल्या डॉक्टर खंडेलवाल दरोडा प्रकरणात तपास कामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 2022 मध्ये भारत सरकारकडून उत्कृष्ट तपासी अधिकाऱ्यांकरीता दिले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाले आहे.