‘त्या’ बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा उपोषणाचा इशारा
अहदमनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या (Parner Taluka Sainik Cooperative Bank) कर्जत शाखेत चेक क्लिअरिंगमध्ये (Check Clearing) अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सहभागातून झाला असल्याचे समोर आले. जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या अधिकार्यांवर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा या मागणीसाठी सोमवारी (ता. ६) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, विठ्ठल वराळ यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने अपहार केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, या चेक घोटाळा प्रकरणात शाखाअधिकारी सदाशिव फरांडे हा व त्याला पाठीशी घालणारे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे यांना जबाबदार धरण्यात आल्याचा अहवाल सहकार विभागाचे पारनेरचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी यांनी दिला आहे. त्यामुळे आता सहकार विभागाच्या आधिकार्याने फिर्यादी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Pankaja Munde : ‘घरात चपटी देणारा नेता’ म्हणत पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा