Shivsena : 24 तासात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू

Shivsena : 24 तासात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू

If the electricity supply is not restored within 24 hours, we will go on a severe protest : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला. या पावसामुळं पीकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा हताश झाला. या वादळी पावसामुळं महावितरणाला (Mahavitaran) देखील चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळं अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळं नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. अहमदनगर शहरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अहमदनगर शहरातील विस्कळीत वीज पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळं पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करुन घोषणाबाजी केली. वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील तीन दिवसांपासून नगर शहर व उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पाऊस पडत आहे. या वादळी वार्‍यांमुळे महावितरण कंपनीच्या वीज वाहक तारा तुटून व वीजेचे खांब पडून मोठे नुकसान झाले. याचा थेट परिणाम शहराच्या वीज पुरवठ्यावर झाला आहे. अनेक भागात 24 तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित झालेला होता. तर इतर भागातही दिवसातून किमान सात ते आठ वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहे, असं सांगण्यात आलं आहे.

Dalai Lama : व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दलाई लामांनी मागितली माफी, म्हणाले…

वादळ व पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून महावितरण प्रशासनाकडे आपत्कालीन यंत्रणा, व्यवस्थापन नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. कर्मचार्‍यांचा वनवा, दुरुस्ती साहित्याचा अभाव यामुळे शनिवारी संध्याकाळापासून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत व्हायला रविवारची रात्र झाली. दरम्यानच्या काळात नागरिकांचे अतोनात हाल झाले. विजेअभावी मोटारी बंद असल्याने इमारतीच्या टाक्यांमध्ये पाणी भरता आले नाही. अधिक काळ वीज पुरवठा बंद राहिल्याने इन्व्हर्टरही बंद पडले. त्यामुळे अनेक छोट्या व्यवसायिकांचे नुकसान झाले. वीज पुरवठा कधी सुरळीत होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक महावितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत होते. मात्र तेथे चक्क कुलूप लावून कार्यालय बंद करण्यात आले होते. अधिकारी फोन घेत नव्हते, त्यामुळे संतप्त नागरिकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागले, असेही निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी बोलतांना संभाजी कदम म्हणाले, येत्या काळात पावसाळा सुरु होणार आहे, त्यावेळी पुन्हा अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पुर्वीच महावितरण कंपनीने यात लक्ष घालून गांभिर्यपूर्वक उपाययोजना कराव्यात, दुरुस्तीची कामे पुर्ण करुन घ्यावीत. आपत्कालीन व्यवस्था, यंत्रणा सज्ज ठेवावी. गरज पडल्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवावी. खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक व व्यवसायिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई महावितरण प्रशासनाला द्यावी लागेल. याबाबत कार्यवाही न झाल्यास नागरिकांसहशिवसेना स्टाईलने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, शहराध्यक्षा अरुणा गोयल, नगरसेवक दत्ता कावरे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, डॉ.श्रीकांत चेमटे, प्रशांत गडाख, अरुण झेंडे, सचिन गोरे, रमेश खेडकर, घनश्याम घोलप, अभिजित अष्टेकर, कैलास शिंदे, प्रणव भोसले, मोहित खोसला आदि उपस्थित होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube