मोदींसमोरच उद्धव ठाकरे म्हणाले मी चुकलो.. : केसरकरांचा गौप्यस्फोट

मोदींसमोरच उद्धव ठाकरे म्हणाले मी चुकलो.. : केसरकरांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray :  काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे दिली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar)यांनी केला. मंत्री दीपक केसरकर रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वाचा : Uddhav Thackeray यांची एंट्री होताच दीपक केसरकरांनी जोडले हात, पाहा नेमकं काय घडलं ?

केसरकर ठाकरेंना उद्देशून म्हणाले, की तुम्हीच आम्हाला सांगतिलं, तुम्ही जा म्हणून आणि आता नागरिकांना खोटं सांगत आहात. आता तरी खोटं बोलू नका. तुम्ही स्वतः पंतप्रधानांसमोर कबूल केले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची चूक तुमच्याकडून झाली. महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करतो असे आश्वासन दिले होते. पण राज्यात आल्यावर तुम्ही दिलेला शब्द मोडला. त्यामुळे कुणी कुणाला फसवले हे लोकांना समजले पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव 

ते पुढे म्हणाले, ज्यावेळी अजित पवार अर्थमंत्री झाले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साडेचारशे कोटी रुपय काढून घेण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प होते. अडीचशे कोटींचा जिल्हा नियोजन मंडळाचा आराखडा होता तो दीडशे कोटींवर नेला. तरीही ठाकरे काहीच बोलले नाहीत. ज्यावेळी अजित पवार उत्तर देत होते त्यावेळी आदित्य ठाकरे हसत होते. हीच त्यांच्या लेखी कोकणची किंमत आहे, अशी टीका केसरकर यांनी केली.

खोकेबाज म्हणवून हिणवल्या जात असल्याच्या मुद्द्यावरही केसरकरांनी ठाकरेंना सुनावले. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला खोके म्हणता. पण, आदित्य ठाकरे यांना लहानपणापासून खोक्यांसोबत खेळण्याची सवय असेल आम्हाला नाही. आम्ही नागरिकांबरोबर राहिलो म्हणून आमदार झालो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube