दोनदा डीए़डची परीक्षा फेल मग थेट पश्चिम बंगाल गाठले; मनोहर भोसलेची सूरस कथा

Manoharmama Bhosale-. भोसले याला 2021 मध्ये एका महिलेवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर भक्तांच्या रांगा.

  • Written By: Published:
Manhor Bhosle Mama

Manoharmama Bhosale: स्वत:ला बाळूमामाचा अवतार सांगून भक्तांना फसविणाऱ्या मनोहर भोसले (Manoharmama Bhosale) याला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) कुर्डूवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुण्यातील मांजरी परिसरातून त्याला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आता त्याचे एक-एक कारनामे बाहेर येत आहेत.

मनोहर भोसले हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरातल्या लासूर्णे गावचा. तो करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे काका व मावशीकडे राहायला आला होता. त्याचे आई-वडिलही याच गावात राहत होता. बारावी झाल्यानंतर त्याने डीएडची परीक्षा दिली. परंतु दोनदा नापास झाला. त्याला शिक्षक व्हायचे होते. परंतु अपयश आले. त्यानंतर तो आठवडे बाजारात बोंबील-सुकट विक्रीचा व्यवसाय करत होता. तो अचानक गायब झाला. त्यानंतर तो थेट पश्चिम बंगालमध्ये गेला होता. तिथे तो जादूटोणा शिकल्याचे बोलले जाते. त्यानंतर उंदरगाव येथे पुन्हा आला. उंदरगाव येथे त्याने दोन एकर शेतजमीन घेतली आणि तिथे आश्रम सुरू केला. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे आणि मी संत बाळूमामाचा अवतार आहे, असा प्रचार करून त्याने अल्पावधीतच आपले प्रस्थ निर्माण केले.


भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात अधिकारी, मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

बाळूमामाचा अवतार असल्याने त्याच्याकडे अमावस्या-पोर्णिमेला भक्ताची रांग लागू लागली. तो भक्ताकडून अकरा हजार रुपयांची पावती घेत होता. त्यामुळे त्याची भरभराट सुरू झाली. एकेकाळी खाण्यासाठी कमविणाऱ्या, झोडपीत राहणाऱ्या मनोहर भोसलेनी करमाळा आणि गाणगापूर येथे मठ बांधले आहेत.


‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’मध्ये गोळीबार करणाऱ्याची ओळख समोर, कोण आहे 31 वर्षाचा तरुण?


बलात्काराच्या आरोपात थेट जेल

करमाळ्यातील घोटी येथे मनोहर भोसले याचा मनोहरधाम नावाने आश्रम आहे. भोसले याला 2021 मध्ये एका महिलेवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणात जामीन झाल्यानंतर मनोहर भोसले याच्याकडे लोक येतच राहिले. पूजा सांगून, बाभळीचा पाला आणि साखरेचा प्रसाद देत त्याने भक्तांकडून लाखो रुपये त्याने उकळले आहेत. या भोंदूबाबाविरुद्ध उंदरगावचे लोक आक्रमक झाले होते. त्यानंतर त्याने तो मठ बंद केला.


बडे नेते आशीर्वाद घेण्यासाठी की फक्त फोटो ?

राज्यातील काही बडे नेतेही मनोहर भोसले याचे भक्त झाले होते. राज्यातील काही नेत्यांचे फोटो मनोहर भोसलेबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विद्यमानमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार धनंजय मुंडे, आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, आमदार सुनील शेळके यांचे फोटो सोशल मीडियावर दिसतात. गेल्या महिन्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण उजेडात आल्यानंतर मनोहरमामा भोसले अंडरग्राउंड झाले होते.

follow us