भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात अधिकारी, मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

मंत्री बावनकुळे यांच्या या संकेतामुळे राज्यातील प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

News Photo   2026 04 26T161953.544

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (Kharat) याचे राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या संपर्काची चर्चा आहे. यातून काहींचे नाव देखील समोर आले आहेत. अशोक खरात याचा विकृतपणा समोर आल्यानंतर, त्यावर वेगवेगळे कलमाखाली जवळपास 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पण त्याच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांच्यावर आता कारवाईचे संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

अशा अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फची कारवाई होईल, असे संकेत मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कुटुंबासह शिर्डी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, अशोक खरात याच्या संपर्कात असलेल्या राज्यभरातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले. मंत्री बावनकुळे यांच्या या संकेतामुळे राज्यातील प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

32 बवावट खाते अन् कोट्यवधींचे डाव, अशोक खरात प्रकरणात पतसंस्थेचा मॅनेजर अटकेत

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशोक खरात याच्याबरोबर याच्या मालमत्ता, जमीन खरेदी किंवा इतर कारनाम्यांमध्ये, अनेक अधिकारी सहभागी असल्याचे समोर येत आहे. महसूल विभागातील अधिकारी देखील आहेत. यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईल.

अशोक खरात याच्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. या चौकशीत भोंदू अशोक खरातशी संबधित अधिकाऱ्यांची नावे समोर येणार आहे. SIT महसुलमंत्र्यांना देखील अंतिम चौकशीचा रिपोर्ट देणार आहे. अशोक खरातची साथ देणारे महसूल विभागातील अधिकारी बडतर्फ होतील,’ असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

follow us