Sujay Vikhe : आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला खासदार विखेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…
अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच माजीमंत्री यादीत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणुकीचे आव्हान दिले होते. आता आदित्य यांच्या या आव्हानाला भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी शाब्दिक टोला लगावला आहे.
अहमदनगर मध्ये बोलताना विखे म्हणाले, ज्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं त्यांच्या पिताश्रींनीही विधान परिषदेचा राजीनामा देण्याचे वक्तव्य केलं होतं, मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे जे म्हणत होते की माझा शब्द अंतिम आहे त्यांनी त्यांचा शब्द पळाला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांने काहीही बोलला तरी त्याला महत्व राहत नाही असं खासदार सुजय विखेंनी म्हंटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. माझ्यासमोर एकनाथ शिंदेंनी वरळीतून उभं राहावं आणि निवडणूक लढवावी. तसेच जेवढे खोके वाटायचे ते वाटा, पण एकसुद्धा मत विकलं जाणार नाही. अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होत.
शिंदे गटाच्या रूपानं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कायमच ठाकरे आणि शिंदे एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटाचे बरेचशे कार्यकर्ते शिंदे गटानं आपल्या गळाला लावले आहेत. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असते. तर अनेकदा खुली आव्हानंही देण्यात येत असतात.