उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी केली ‘ही’ मागणी
अहमदनगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खुन, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसा चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंग सारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा आहेत. जिल्ह्यासह राज्यभारातून ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. शहरामध्ये वारंवार गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या जातीवादी तणावातून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा परिणाम थेट बाजारपेठ तसेच व्यापारी वर्गावर होत असतो. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
मायक्रो प्लॅनिंगनं प्रचार केला तसच पराभवाचं आत्मपरीक्षण करा, टिळकांचा भाजपला सल्ला
या भीतीदायक वातावरणाचा नाहक त्रास होऊन आठ ते दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवावी लागते. त्याचा परिणाम थेट व्यवसायावर होतो. याचबरोबर राज्यभर शहराची बदनामी देखील होत असते, तरी वरील बाबींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन अहमदनगर शहरासह जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले.
IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर
याकरिता आपणाकडून संबंधितांना आदेश पारित करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार जगताप यांनी निवेदन देत याप्रश्नी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.