Nilesh Lanke : येत्या दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येणार; निलेश लंकेचा दावा

Nilesh Lanke : येत्या दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येणार; निलेश लंकेचा दावा

अहमदनगर : शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली व यामुळे महाविकास आघाडी सरकारची सत्ता संपुष्टात आली. मात्र येत्या दीड महिन्यात पुन्हा आपलेच सरकार येईल असे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी एका कार्यक्रमात केले आहे. लंके यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच उपसरपंच पदाचा पदभार आमदार लंके यांच्या उपस्थितीत झाला. सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री कोकाटे यांनी पदाचा पदभार घेतला आहे. यावेळी आमदार लंके बोलत होते. यावेळी बोलताना लंके म्हणाले, आमचे सरकार होते तेव्हा कधीच आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही, मात्र भाजपचे सरकार आले आणि त्यांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला.

आमच्याकडे सत्ता असताना मी कधीच कोणाचा राग राग केला नाही. प्रत्येक गावात मोठा निधी दिला हे गाव माझ्या मतदारसंघात नसताना सुद्धा 20 लाख दिले .आता गावात आमची सत्ता आली आहे पण राज्यात नाही ती पण दीड महिन्यात पुन्हा येणार आहे असे भाकीत लंके यांनी केले.

तसेच पुढे बोलताना लंके म्हणाले, चिचोंडी पाटिल गावच्या सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक जाणीवपूर्वक लांबविण्याचे कारस्थान केले गेले. यावेळी लंके यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाधयक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube