शिर्डी लोकसभा : आठवलेंनी वाढवलं खासदार लोखंडेंचं टेन्शन

शिर्डी लोकसभा : आठवलेंनी वाढवलं खासदार लोखंडेंचं टेन्शन

अहमदनगर : काल शिर्डी दौऱ्यावर असतांना रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं. शिर्डी लोकसभा मतदार संघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांचे टेन्शन वाढले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाला नागालॅंड विधानसभेत दोन जागा मिळाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. नागालॅंडमध्ये मिळालेल्या विजयानंतर आठवले गट चांगलाच सक्रीय झाला. काल शिर्डीत बोलतांना मी पुन्हा शिर्डी लोकसभा लढवणार असल्याचं आठवलेंनी सांगितलं. ते म्हणाले, मागच्या निवडणूकीत मी शिर्डीतून पराभूत झालो होता. मात्र, आता मला पुन्हा शिर्डी मतदार संघातूनच लोकसभेला उभं राहण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवेल, असं वक्तव्य आठवलेंनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आठवलेंनी 2009 पूर्वी पंढरपूर मतदार संघातून निवडूक लढले होते. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघ पुर्नरचना झाल्या आणि पंढरपूर मतदारसंघाऐवजी माढा मतदार संघाची निर्मिती झाली. मात्र, शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढणार असल्यानं 2009 मध्ये आठवलेंनी शिर्डी लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना मतदारांनी नाकारलं होतं. त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. राज्यात कॉंग्रसचे तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळेच आठवलेंचा पराभव झाला होता, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचौरे यांनी 3 लाख 59 हजार 921 मते मिळाली होती. तर रामदास आठवले यांनी 2 लाख 27 हजार 170 मते मिळाली होती.

Maharashtra Assembly : शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन विधानसभेत जोरदार हंगामा

दरम्यान, सध्या केंद्रात भाजप आणि रिपाई आठवले गटाची युती आहे. तर राज्यात भाजप आणि शिंदे गट यांची युती असून खासदार लोखंडे हे युतीकडून विद्यमान आहेत. त्यामुळे आठवलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढले. कारण, भाजप आणि शिवसेना यांची यूती असतांना शिर्डी मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला येत होता. 2014 ते 2019 या दोन्ही निवडणुका शिवसेनेने लढल्या आणि ते जिंकले. नंतर राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाले. शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता शिर्डीची जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळे आठवलेंनी शिर्डीतून लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शिंदे गटाचे टेंशन वाढले असून, आता भापज शिर्डीची जागा शिंदे गटासाठी राखीव ठेवते की, आठवलेंसाठी शिर्डीतून लोखंडेंना माघार घ्यायला सांगते, हेचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube