साई संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर सीईओ मिळाले; पी. शिवशंकर यांची नियुक्ती

साई संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर सीईओ मिळाले; पी. शिवशंकर यांची नियुक्ती

Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबा संस्थानला अखेर पाच महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे.

सुप्रियाताई केंद्रात अजितदादा राज्यात ? ; राष्ट्रवादीची कमान कुणाच्या हातात..

पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पूर्वी त्यांनी सोलापूरचे महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

‘जिथे आमचा देव नाही’ तिथे आमचा…; अजितदादांच्या जवळच्या जगतापांची राजीनाम्याची तयारी

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची नागपूर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर नियुक्ती झाली नव्हती. डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंडे यांची नियुक्ती होणार अशी चर्चा होती. परंतु त्यांची नियुक्ती झाली नव्हती.

शिर्डी संस्थानचा कारभार मोठा आहे. त्याशिवाय राजकीय नेत्यांसाठी, व्हीआयपी शिर्डीला येत असतात. साई संस्थानचे वाद न्यायालयात जातात. अशा परिस्थिती संस्थानचा कारभार हा तब्बल पाच महिने उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता. आता आयएएस अधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती झाली आहे. ली आहे. त्यांची नागपूर येथील वस्त्रोद्योग संचालकपदावरून शिर्डीला बदली झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube