Mahendra Gaikawad : अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ जखमी, सोलापुरचा महेंद्र गायकवाड ठरला ‘हिंदकेसरी’
साताऱ्यात आयोजित कुस्ती स्पर्धेत तीन वेळा उपमहापौर केसरी किताब पटकावलेला सोलापुरचा पैलवान महेंद्र गायकवाड हिंदकेसरी ठरलायं.
Mahendra Gaikawad : तीन वेळा उपमहापौर केसरी किताब पटकावलेला सोलापुरचा पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikawad ) हिंदकेसरी ठरलायं. स्पर्धेच्या अंतिम लढतीत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे महेंद्र गायकवाडला विजयी घोषितत करण्यात आलं. महेंद्रने गदा पटकावताच संपूर्ण आखाडा थरथरुन गेला. तर महिला हिंदकेसरी स्पर्धेत हरियाणाच्या काजल डोचक हिने गदा पटकावली आहे. साताऱ्यात कुस्तीमहर्षी पै. साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षनिमित्त हिंद केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत उपस्थिती किती टक्के? विधिमंडळाची आकडेवारी आली समोर
एनसीआरचा पैलवान रजत राहुल याला आस्मान दाखवत पृथ्वीराज मोहोळने अंतिम लढतीत प्रवेश केला. तर महेंद्र गायकवाडने दिल्लीचा पैलवान अनिरुद्ध कुमारचा पराभव करत अंतिम लढतीत स्थान मिळवलं. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड दोघे भिडले. मात्र, लढत सुरु होताच दोघांनीही एकमेकांना आजमावत शड्डू ठोकला.
राज्यात विजांच्या कडकडाटास वादळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
लढतीच्या सुरुवातीपासूनच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. भारंदाज डाव टाकताना महेंद्रकडून पृथ्वीराजचा हाताला दुखावला. त्यामुळे पृथ्वीराज जखमी झाला. पृथ्वीराज जखमी होताच लढत थांबवण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांनी तत्काळ पृथ्वीराजच्या हाताची तपासणी केली, त्यानंतरही पृथ्वीराज आखाड्यात उतरला होता. मात्र, हाताला वेदना होत असल्याने पृथ्वीराजने अखेर माघार घेतली आणि महेंद्र गायकवाड हिंदकेसरी ठरला.
भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो; सरन्यायाधीशांचे ‘झुरळ’ वक्तव्यावरून स्पष्टीकरण