Pruthviraj Mohol : महेंद्रला माझा हात उखडायचाच होता…जखमी पृथ्वीराज मोहोळचे गंभीर आरोप
महेंद्र गायकवाडला माझा हात उखडायचाच होता, असा गंभीर आरोप पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
Pruthviraj Mohol : साताऱ्यात मानाची हिंद केसरी स्पर्धा राजश्री शाहु महाराज स्टेडिअमध्ये पार पडली. या अंतिम लढती सोलापुरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्या चुरशीची लढत होती. या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्याने महेंद्र गायकवाडने हिंदकेसरीची मानाची गदा पटकावलीयं. या लढतीत महेंद्र गायकवाडला माझा हातच उखडायचा होता, असा गंभीर आरोप पृथ्वीराज मोहोळ याने लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहिर; स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
पुढे बोलताना पृथ्वीराज मोहोळ म्हणाला, महेंद्र गायकवाडने माझ्यावर जो डाव टाकला हा कुस्ती स्पर्धेतला डाव नव्हता. महेंद्रने माझ्यासोबत दोस्तीत कुस्ती केलेली आहे. महेंद्र डोक्यात ठरवूनच आला होता, त्याला माझा हात उखडायचाच होता. मी पंचाना सांगितलं तरीही महेंद्र माझा हात पिळतच होता, सोडतच नव्हता असा गंभीर आरोप पृथ्वीराज मोहोळने केलायं.
तसेच कोणत्याही पैलवानाला विचारा हा 90 अंशाचा कोन होता की काय होतं? दोन्ही हाताने हात होल्ड करणे बेकायदेशीर आहे. त्याच्या डोक्यात काय होतं माहित नाही त्याच्या साथीदारांनी त्याला काय सांगितलं होतं. कुस्ती सुरु असताना मी थांबवण्याचा प्रयत्न करत होतो सगळेच ओरडत होते हात बघा. मी खाली पडलो तेव्हा कुस्ती शेवटी त्यानेच थांबवली. बाहेरुन म्हणतच होते की सोडू नको हात मला स्पष्ट आवाज येत होता. शिट्टी मारेपर्यंत त्याला जे काही करायचं होतं ते त्याने केलेलं होतं. पंच मागे होता नंतर पुढे आला शिट्टी वाजवायला उशिरच झाला. रागाच्या भरात मी बोललो की तु मला अशी इजा करुन जिंकलास परत मी तूला दाखवेन की कुस्ती कशी जिंकायची असं मी त्याला बोललो होतो. नंतर मी पुन्हा कुस्ती करायला गेलो पण माझा हातच गळून पडला असल्याचं मोहोळ म्हणाला आहे.
दरम्यान, हिंद केसरीच्या आखाड्यात कुस्तीच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी आणि नाट्यमय घडामोड घडली. डाव प्रतिडाव टाकत असताना महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. याच वेळी पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पृथ्वीराज मोहोळ याने मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यामुळे पंचानी महेंद्र गायकवाड याला 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केले. महेंद्र गायकवाड याला मानाची चांदीची गदा आणि बक्षीस म्हणून तब्बल ‘महिंद्रा थार’ गाडी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर देण्यात आला.
गौतम अदानींना अमेरिकेत मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात सर्व आरोप मागे अन् खटला कायमस्वरूपी बंद