अहमदनगरमध्ये खळबळ, सौंदर्य प्रसाधनाच्या स्टोअर्समध्ये आढळल्या तलवारी, मालकाला ठोकल्या बेड्या
Swords found in women’s cosmetics shop in Ahmednagar city : काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील कापड बाजारात (Textile market) व्यापाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घडना ताजी असतांनाच आता मोची गली परिसरात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानात पोलिसांना तलवारी सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मालक नंदकिशोर मोडलाल बायड (Nandkishor Modlal Bayad) (वय ५३) याला पोलिसांनी अटक केली आहे.
काल सांयकाळी ही पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, मोची गल्ली कापडबाजार येथील महाविर स्टोअर्समध्ये तलवाराची बेकायदेशीर विक्री होत आहे. तुम्ही आता गेल्यास कारवाई करू शकाल. ही माहिती मिळाल्यानंतर महाविर स्टोअर्समध्ये आम्ही गेलो. दुकानाची झडती घेतली असता काउंटरखालील भागात तलवारी आढळून आल्या.
Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया
दरम्यान, या तलवारी दुकानात विक्रीसाठी ठेवल्या होत्या की अन्य काही कारणासाठी ठेवल्या होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
या तलवारी पितळी धातूपासून बनवलेल्या आहेत. त्यावर “सिरोही की तलवार गॅंरटी 30 साल’ असे लिहिले आहे. पोलिसांनी दुकानाचे मालक बायड यांच्याकडे तलवारीबाबत चौकशी केली. मात्र, बायड यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हे दुकान महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने आणि भेटवस्तू विकते. अशा स्थितीत तलवारी कशा आल्या? याची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या प्रश्नाचे उत्तर दुकानमालक बायड यांना देता न आल्याने पोलिसांनी तलवारी जप्त केल्या.
भारतीय शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे. या तलवारी तेथे विक्रीसाठी ठेवल्याचा संशय आहे. मात्र, तलवारी कुठून आणल्या, आतापर्यंत किती जणांना विकल्या, त्याचा कशासाठी वापरला जात आहे? पोलीस त्याचा तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली फौजदार मनोज कचरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, ए. पी. इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.