ठाकरेंची गाडी पुन्हा ‘वर्षा’वर न्यायची, नगरमधील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

  • Written By: Published:
ठाकरेंची गाडी पुन्हा ‘वर्षा’वर न्यायची, नगरमधील ‘या’ बड्या नेत्याचं विधान

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, भाजप तसेच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. आता माजी आमदार विजय औटी (Former MLA Vijay Outi) यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार निशाणा साधला. ज्यांच्याकडे सभ्यतेने पाहत होतो ते असभ्य निघाले. कारण, शिवसेनेत आजवर अनेक बंड झाली, त्या बंडांना बाहेरचं पाठबळ नव्हतं. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेली बंडखोरी ही कुणाची करणी आहे, हे महाराष्ट्राला कळून चुकलं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाना साधला.

अहमदनगरमधील माऊली सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विजय औटी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात २० जून २०२२ पासून १० दिवसांत एका माणसाने स्क्रिप्ट लिहिली. ही स्क्रिप्ट कोणी लिहिली हे महाराष्ट्राला सव्वा महिन्यात कळाले. शिवसेनेतील खासदार, आमदार बदलले, पण शिवसैनिक बदललेला नाही. आता मातोश्रीवरही स्क्रिप्ट तयार आहे. २०२४ ला पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार. पुन्हा ठाकरेंची गाडी सन्मानाने वर्षा बंगल्यावर न्यायची आहे, असा निर्धारही औटी यांनी केला. ते म्हणाले, बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन केलेली खरी शिवसेना टिकली तरच मराठी माणूस टिकेल. त्यासाठी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेच असल्याचं ते म्हणाले.

Pathan : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ची विजयी घौडदौड सुरूच, गाठला 1021 कोटींचा पल्ला 

औटी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटकाळात चांगले काम केले. त्यामुळे ते देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत होते. म्हणून भाजपने इर्षेने त्यांचे पद, पक्ष व पक्ष चिन्ह घालविण्यासाठी स्क्रिप्ट तयार केली. आता ‘मातोश्री’वरही स्क्रिप्ट तयार आहे. आता भाजपचे पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय कळाले. ज्यांच्याकडे सभ्यतेने पाहत होतो ते असभ्यतेचे लक्षण निघाले, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

या प्रसंगी व्यासपीठावर उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, युवा सेना कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे, माजी आमदार उल्हास पाटील, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube