गोदावरी नदीपाञात बुडून तिघांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु

गोदावरी नदीपाञात बुडून तिघांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु

अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने श्रीक्षेञ मढी येथे देवाला पाणी घेवून जाण्यासाठी प्रवरासंगम येथे आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील चार जण गोदावरी नदीमध्ये उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाल्याची दुर्देवी घटना शनिवार (दि.११) रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदीपाञात तीन जणांचा शोध घेण्यास प्रशासनाला यश आलेले असून तिघा जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर एका जणाचा शोध सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पालखेड (ता.वैजापूर) येथून पाच जण प्रवरासंगम येथे आलेले होते. अंघोळ करुन श्रीक्षेञ मढी येथे देवाला पाणी घेवून जाण्यासाठी चार जण गोदावरी नदीपाञात पोहण्यास उतरले. माञ नदीपाञात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एकाला प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर तिघा जणांचा मृतदेह एनडीआरएफच्या जवानांकडून अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र अद्यापही एका जणाचा शोध सुरु आहे.

शाळेत खोटा इतिहास शिकवला जातोय, शिक्षण पद्धतीवर कालिचरण महाराजांची टीका

नदीपाञात बुडून मृत्यु झालेल्या युवकांचे नाव
अक्षय भागिनाथ गोरे (वय१९), शंकर पारसनाथ घोडके (वय २९), बाबासाहेब अशोक गोरे (वय २९) या तिघांचे मृत्युदेहाचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर चौथा युवक नागेश दिलीप गोरे (वय २६) या युवकाचा अद्यापही नदीपाञात शोध सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube