‘आमदार लंकेंनी बेताल वक्तव्य करणं टाळावं, त्यांना पुन्हा निवडून…’; विखेंचा इशारा

‘आमदार लंकेंनी बेताल वक्तव्य करणं टाळावं, त्यांना पुन्हा निवडून…’;  विखेंचा इशारा

Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : दोन दिवसांपूर्वी आळंदीत दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्च करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमलटे होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी बाब असून या घटनेच्या निषेधार्थ व नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. दरम्यान, आमदार लंके यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आमदार लंकेना चांगलेच फटकारले आहे. लंकेंना अजून खूप काही शिकायचं आहे. त्यांनी अशी बेताल वक्तव्य करणं टाळावं, अशा शब्दात विखेंनी लकेंना सुनावलं. (Warning to Radhakrishna Vikhe Patal MLA Nilesh Lanke; Vikhe said, Lanke should avoid making absurd statements.)

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमानंतर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांकडून विखे यांना आमदार निलेश लंकेंनी फडणवीसांवर केलेल्या टिपण्णीवर प्रश्न केला. यावर बोलताना विखेंनी आमदार लंकेंना खडेबोल सुनावले.

नेमकं काय म्हणाले मंत्री विखे?
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. पारनेरच्या आमदारांना अजून खूप काही शिकायचं आहे. पारनेरचे आमदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांना पुन्हा निवडून यायचं दिसत नाही. पारनेरच्या आमदारांनी अशी बेताल वक्तव्य करणं थांबवायला हवं, असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Tiku Weds Sheru: कंगनाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली, ‘नवाजुद्दिन नव्हे तर इरफान खानला घेऊन करायचा…’ 

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरला जातात. यावर्षीही वारकरी पंढरपुरकडे जायला निघाले होते. मात्र, आळंदीत माऊलांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू असतांना पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आळंदी येथील वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केलं होतं. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या एका वारकऱ्यांशी लंके यांनी रुग्णालयात जाऊन संवाद साधला आहे. या घटनेबाबत आमदार लंके यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले होते. त्याला आता विखे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube