महाडिकांच्या झोळीत काय? हे ज्याची कुवत आहे त्यालाच कळेल; महादेवराव महाडिक आक्रमक
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory)निवडणुकीवरुन कोल्हापूरचं (Kolhapur)राजकीय वातावरण (political climate)चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक गट (Former MLA Mahadevrao Mahadik)आणि आमदार सतेज पाटील गट (MLA Satej Patil group)पुन्हा एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महाडिक म्हणाले की, महाडिकांच्या झोळीत काय आहे? हे ज्याची कुवत आहे, त्यालाच कळेल. निवडणूक (Election)म्हणजे कालचक्र (time cycle)आहे. त्यातून सर्वांना जावं लागणार आहे.
त्याचवेळी पत्रकारांनी विचारले की, महाडिक कुटुंबाला सभासद कंटाळले आहेत का? असा सवाल केल्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की महाडिक कुटुंबाला सभासद कंटाळले आहेत, असं म्हणणाऱ्यााला माझ्या समोर आणा, असं थेट आव्हानचं एकप्रकारे आमदार सतेज पाटलांनी यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिकांनी दिलं आहे. निवडणुकीनंतर लागलेल्या निकालात सर्व गोष्टी समजतील त्या मी आज सांगू शकत नाही. ती वेळच सांगेल असंही यावेळी महादेवराव महाडिक म्हणाले.
ऊस वाहतूक कामगारांची मुकादमांकडून फसवणूक; राजू शेट्टी आक्रमक
महाडिक म्हणाले की, महाडिक कुटुंबाला सभासद कंटाळले असं कुठल्या माणसानं तुम्हाला सांगितलं त्या माणसाला तुम्ही माझ्याकडं घेऊन या, आम्ही राजकारणातून सन्यास घेऊ, तसं कधीही महाडिकांनी काही केलेलं नाही.
बाकीच्यांनी केलं ते माहाडिक कधीच करत नाही, पण तुमची हिंमत नाही असा प्रश्न त्या माणसांना उलटा विचारायची असंही यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले. संपूर्ण कोल्हापूर आम्ही उकळून पिलो आहे. ही निवडणूक व्यक्तीशः पातळीवर नेण्याची गरज नसल्याचंही यावेळी ते म्हणाले.
ही निवडणूक 122 गावातील सभासदांवर आहे. ही निवडणूक 122 गावांतील सभासदांच्या हक्कासाठी आहे. ज्यांनी व्यक्तिशः पातळीवर स्वार्थ केला आहे. ज्यांनी खासगीकरणाचा डाव केला त्यांनी तो त्यांच्या कारखान्यात केला आहे. तो या राजाराम कारखान्यात चालणार नाही अन् तो आम्ही होऊ देणार नसल्याचेही यावेळी सांगितले.त्यामुळे एकूणच कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यात आता लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे.