बीआरएसमध्ये कोणती जबाबदारी? माजी आमदार मुरकुटेंनी स्पष्टच सांगितलं…

बीआरएसमध्ये कोणती जबाबदारी? माजी आमदार मुरकुटेंनी स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रातही आपले पाये रोवली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी घरच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आता माजी आमदार भानूदास मुरकुटेंनीही बीआरएस पक्षाची माळ गळ्यात बांधली आहे. बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर भानुदास मुरकुटेंनी माध्यमांशी संवाद साथला आहे. जिल्ह्यातच मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभरात बीआरएसचं काम सुरु करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Manipur Violence : महिला विवस्त्र धिंड प्रकरण; सीबीआयने सूत्र हाती घेताच आरोपी वाढले…

पुढे बोलताना मुरकुटे म्हणाले, आपण बीआरएसमध्ये प्रवेश केला असून आपले काम केवळ जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहणार नाही. पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आपल्याला राज्याची जबाबदारी दिली आहे. राज्याचे काम करण्याची जबाबदारी असल्याने जिल्ह्याचं काम देखील या माध्यमातून होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

I.N.D.I.A. चे ‘हे’ नेते उद्या मणिपूरला जाऊन, देणार मदत शिबिरांना भेट

राज्य सरकारने अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने नवे वाळू धोरण जाहीर केलं आहे. या वाळू धोरणावर मुरकुटेंनी भाष्य केलं आहे.

राज्य सरकारचं नवं वाळू धोरण ही सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातील काहीशा चुका होतील. राज्य सरकारचा हा प्रयोग चांगला असून यामध्ये शासनाला किती यश मिळणार हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube