‘सनातन’ म्हणजे काय? प्रकाश आंबेडकरांनी एका शब्दांत सांगितलं…

‘सनातन’ म्हणजे काय? प्रकाश आंबेडकरांनी एका शब्दांत सांगितलं…

prakash Ambedkar : देशभरात सध्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन’ धर्माविषयीच्या विधानानंतर रान पेटलेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही एक फेसबुक पोस्ट करीत सनातन धर्माचा अर्थच समजावून सांगितला आहे. प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव न लिहिता पोस्ट केलीयं खरी परंतु उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाशी ते सहमत असल्याचं पोस्टवरुन दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून सनातनचा अर्थ एका शब्दांत सांगितला आहे. सनातन म्हणजे छुआछूत (अस्पृशता) असं ते म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी कोणाचे नाव न घेता ही पोस्ट केली आहे.

Maratha Reservation फडणवीसांची क्षमायाचना म्हणजे एकप्रकारची कबुलीच – शरद पवार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सनातन धर्माविषयी विधान केल्यानंतर त्यांच्या विधानावर बोट ठेवत भाजपच्या अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली. एवढंच नाहीतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या विधानावर आक्षेप घेत टीका केलीयं. हिंदु द्वेषातून हे झाल्याचं अमित शाह म्हणाले आहेत. या संपूर्ण घडामोडीवर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला असून त्यानंतरही स्टॅलिन आपल्या विधानावर ठाम असल्याचं दिसून आलं आहे.

काय म्हणाले होते स्टॅलिन?
सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.

PM मोदी सुट्टी घेत नाहीत! व्हायरल होणाऱ्या चर्चांवर अखेर PMO चे शिक्कामोर्तब

दरम्यान, स्टॅलिन यांच्या विधानानंतर त्यांनी मी माझ्या विधानावर ठाम असल्याचं दाखवून दिलं आहे. मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन. मी फक्त हिंदू धर्माचाच नाही तर सर्व धर्मांचा उल्लेख केला होता. मी धर्मातील जातीव्यवस्थेचा निषेध करताना ते बोललो होतो, आणखी काही नाही” असं उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं आहे.

एकीकडे इंडिया आघाडीमध्ये वज्रमूठ बांधण्यात येत असताना स्टॅलिन यांच्या विधानामुळे भाजपने इंडियालावरही चांगलाच निशाणा साधला आहे. अशातच महाराष्ट्रातील इंडिया आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंवरही भाजपच्या नेत्यांकडून सवाल करण्यात आले आहेत. आता उद्धव ठाकरे गटासोबत युती असलेल्या वंचितचे प्रमुख आंबेडकरांनी ही पोस्ट केल्याने त्यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube