Video : अजित पवारांच्या बायोपिकमध्ये अभिनेता कोण? स्वतः अजितदादांनी दिलं होतं उत्तर

Ajit Pawar : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांचं निधन झालं आहे.

  • Written By: Published:
Ajit Pawar

Ajit Pawar : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अजित पवार यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यापैकी एक व्हिडिओ म्हणजे त्यांच्या बायोपिकबद्दलचा. या व्हिडिओमध्ये अजित पवार त्यांच्या बायोपिकबद्दल बोलतात. तसेच त्यांची भूमिका कुणी करावी याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ झी गौरव चित्र पुरस्कार 2024 (Zee Gaurav Chitra Awards 2024) चा आहे. या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो की, द अजित पवार (Ajit Pawar) नावाचा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी? असा प्रश्न अजित पवार यांना विचारतो. यावर उत्तर देत अजित पवार म्हणतात की, निलेश साबळे यांनी करावं. त्यावर निलेश साबळे म्हणतो की, मी किती चांगला करायचो हे माहिती नाही पण हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, दादा स्वत:बघतात. पण, आता मला कळलं आहे त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे. यावर अजित पवार म्हणतात की, मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु निलेश साबळे यांनी बऱ्याचदा या ठिकाणी, या ठिकाणी म्हणत माझी नक्कल केली. तेव्हापासून मी ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल तेवढा कमी वापरायचा. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्याातून मलाही कळेल आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by अभिषेक बारहाते पाटील (@who_abhishek_barhate)

मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बेल्टची किंमत 1 लाख रुपये? नवीन वादाला सुरुवात-

28  जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बरामती येथे जात असताना अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. अजित पवार यांच्यासह या अपघतात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

follow us