Vishwas Patil Blog : मराठा-कुणबी हे हाडाचे शेतकरी अन् श्रेष्ठ क्षत्रिय सुद्धा!

Vishwas Patil Blog : मराठा-कुणबी हे हाडाचे शेतकरी अन् श्रेष्ठ क्षत्रिय सुद्धा!

आपल्या शेतीला आपली काळी आई मानून तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे. आपल्या वाट्याला आलेली आपल्या पूर्वजांची जमीन प्राणापलीकडे जपणारे, अत्यंत बिकट स्थितीत सुद्धा जमिनीवरचा हक्क न सोडणारी कष्टाळू जमात म्हणजेच कुणबी मराठा. ते जसे हाडाचे जिद्दी शेतकरी आहेत. तसेच ते श्रेष्ठ क्षत्रीय वंशाचे सुद्धा आहेत, असे अनेक दाखले संस्कृत वाङ्मयात आणि इंग्रजी कागदपत्रांमध्ये सुद्धा आढळून येतात.

कुणब्यांचा भारतीय स्तरावरचा उल्लेख काही ठिकाणी कुर्मी, तसेच कुर्मी क्षत्रिय, कुणबी तसेच दक्षिणेमध्ये कापू तर उत्तर कर्नाटक व बेळगाव भागात कुरवाडी या नावाने सुद्धा केला जातो. मूळची आर्यन वंशाची ही जमात उत्तर हिंदुस्थानातून पंधराव्या व सोळाव्या शतकात दक्षिण भारतामध्ये आली. त्यांच्या पूर्वजांच्या राजाचे नाव सोमवंशीय राजा सुमित्रा असे असून त्याचा मुलगा ग्रीतमद होता. जाने ऋग्वेदाचे लेखन केले.

Bacchu Kadu : ‘निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन’; बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

दिल्लीचा इतिहासप्रसिद्ध सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि त्याचे वंशज जगतसिंग व जयसिंग हे सारे कुर्मी म्हणजेच कुणबी समाजाचे कीर्तिमान सम्राट होते.

जगाच्या इतिहासात अनेक वेळा उद्भवलेल्या अत्यंत बिकट अडचणीतून नवे नेतृत्व जन्माला येत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे आज जरांगे पाटलांसारखा एक सामान्य कार्यकर्ता त्यांना काळानेच मोठे नेते बनवले आहे याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. त्यांनी हातात घेतलेला विषय म्हणजे इथल्या कोट्यवधी कष्टकरी, गरीब शेतकरी वर्गाच्या अनेक वर्षांच्या अन्यायाचा हुंकार बनला आहे, हे आपणांस विसरून चालणार नाही.

कुर्मी तथा कुणबी यांचे पूर्वज राणावंशी ज्यामध्ये उदयपूरचे राणा प्रताप येतात. महाभारत काळामध्ये कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडलेल्या गंगा सिंहाचे वंशज म्हणजे सुद्धा कुणबी समाज होय असेही पुरावे आहेत. त्याबरोबरच त्यांच्या क्षत्रिय कुळांची यादीही खूप मोठी आहे.

क्षत्रिय कुणब्यांचे पूर्वापार पाप म्हणजे तलवारीबरोबरच त्यांनी नेहमी शेतीही पिकवली! तसेच समाजातील इतर सर्व ऐतखाऊ वर्गाला भुके मरू दिले नाही. त्याच पापाची फळे आज क्षत्रिय कुणबी भोगत आहेत. त्यांच्या कष्टाच्या जीवावर ऐतखाऊ सरंजामदार, इनामदार आणि कोकणातले जुलमासाठी प्रसिद्ध असलेले खोत अजून डरकाळी फोडत आहेत.

महाराष्ट्रातील ह्या कष्टकरी, अर्धउपाशी, गरीब, कुणबी मराठ्यांनी स्वतः दैन्य भोगले. आजवर सर्वच पक्षातील मराठा नेतृत्वाला दुर्दैवाने आपल्या गरीब बांधवांकडे आणि त्यांच्या जीवनामरणाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला फारशी उसंत मिळाली नाही.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त भरडला गेलेला व आर्थिक दृष्ट्या नागवला गेलेला समाज म्हणजेच महाराष्ट्रातील कुणबी समाज होय. दुर्दैवाची बाब म्हणजे नेहमीच ज्या बहुजन मराठा समाजाने गेल्या 70 वर्षात सत्तेतली सर्वाधिक मंत्री पदे, अधिकार आणि नावलौकिक ज्या सत्ताधाऱ्यांना दिला. त्यांच्याच काळामध्ये कुणबी मराठ्यांना, ज्या होत्या त्या सवलतीना व कायदेशीर हक्काला मुकावे लागले, यासारखे दुर्दैव नाही.

छगन भुजबळांच्या नेतृ्त्वात OBC नेते एकवटले; 17 नोव्हेंबरपासून शिंदे सरकारविरोधात एल्गार

विदर्भामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कुणबी मराठा समाज्याच्या नोंदी योग्य वेळी कागदोपत्री दाखल करून घेण्याची समयसूचकता दाखवली. बाजूला कर्नाटकमध्ये घोरपडे आडनावाच्या मंत्रिमहोदयांनीही काही वर्षांपूर्वी अशीच जागरूकता दाखवली.

मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या काही कुणब्यांच्या नोंदी होत होत्या, त्या सुद्धा 1967 मध्ये सरकारनेच बंद करायला लावल्या. मंडल आयोगाच्या दिवसात त्यांच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष केले. गरिबांच्या कमरेची लंगोटी काढून घेण्यासारखाच हा प्रकार ठरला.

कष्टकरी मराठा समाज हा सर्वात मोठा लढाऊ आणि भिडाऊ समाज आहे. हे कोणीही विसरू नये. या समाजाचे वर्णन करताना इंग्रजी विद्वान सर जॉर्ज कॅम्पबेल असं म्हणतो, “They are on an average darker and less good looking than the Brahmins and Rajput and still quiet Aryans in their features and institutions and manners”

महाराष्ट्रातील मराठा कुणब्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थी “धारदार ” इतिहास आहे. एकीकडे शेतकामासाठी धारदार खुरपे आणि दुसरीकडे युद्ध मोहिमांसाठी तलवार. पावसाळ्यामध्ये मृग नक्षत्राला भात शेतीची पेरणी करायची आणि दसऱ्याला एकदा धान्य खल्यात येऊन पडले की, घोडा आणि तलवार घेऊन मोहिमेवर बाहेर पडायचे हा त्यांचा ज्धर्म.

मराठ्यांचे सैन्य हे शिवकालात सुद्धा शेतकऱ्यांचे सैन्य होतं. पहिली पाऊसकाळात खडकाचे पीठ करून शेती पिकवायची आणि दसऱ्यानंतर दुश्मनाला दाही दिशा पळवून लावायचे हाच मराठ्यांचा धर्म होता.

ब्रिटिश व इतर स्वदेशी कागदपत्रातून सुद्धा कुणबी मराठा समाजाची म्हणजेच बहुजन मराठा समाजाची केलेली वर्णने खूप चप्पखल आहेत. त्यांची दैवते केदारलिंग म्हणजेच कोल्हापूरचा जोतिबा, त्यावेळच्या निजाम राज्यातील तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडेराया, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका तसेच यल्लमा.

तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!

कुणबी मराठ्यांची एकूण आडनावे 162 होती. ओठावर पिळदार मिश्या डोक्यावर शेंडी. त्याचप्रमाणे ब्रिटिश कागदपत्रात म्हटल्याप्रमाणे ते husbundsmen होते. पशुपालक होते. शेतीसाठी बैल, कोकणातील बंदरावरून घाटमाथा चडून देशावर करावयाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारे चारण (शेकडो बैलांची खिलारे), तसेच मोहिमांसाठी घोड्यांच्या पागा, दूधदुभत्यासाठी गाई-म्हशी अशी लाखो जनावरे मराठा कुणबीच पाळत होते. पुढे पशुपालन संपले. सर्वांची गुजराण ही शेतीवर आली. लोकसंख्या वाढली.

शेतांचे तुकडे झाले आणि इकडे स्वातंत्र्यानंतर आपल्या हक्काच्या कागदपत्रातून शासकीय पातळीवर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

जर आज ब्रिटिशांच्या जनगणनेमध्ये कुणबी मराठ्यांच्या बहुतांशी सर्व जिल्ह्यात लाखो नोंदी आढळत असतील, तर त्या पुढे गेल्या कुठे? Who is custodian of government records? रेकॉर्ड जागेवर राहिले नसेल किंवा ठेवले नसेल तर त्यामध्ये रोज मातीत मरणाऱ्या गरीब कुणब्यांचा काय दोष?

आजवर इतर जाती धर्मियांसाठी मराठा नेतृत्वाने वेळोवेळी अनेक जी. आर. काढले. ते रेकॉर्डवर सर्वत्र उपलब्ध आहेत. अनेकदा अनेक समाजाना फक्त पंचनाम्यावरून जात नोंदणीची खिरापत वाटण्यात आली आहे. असं असेल तर कुणबी मराठ्यांच्या पोरांनी किमान न्यायाची अपेक्षा का न धरावी?

हा विषय कोट्यवधी रयतेच्या जगण्यामरण्याचा आहे. त्यामुळे कृपया मूळ विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये. केले जाऊ नये आणि केले तर ते काळाच्या कसोटीवर टिकणार नाही, हेही ध्यानात घ्यावे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube